पंकज खोले
पुणे : पतीच्या निधनानंतर मुलीच्या सांगण्यावरुन दुसरे लग्न करण्याची इच्छा झाल्याने ऑनलाईन जोडीदार शोधणार्या महिलेला लंडन येथील वराने तब्बल 43 लाखांना गंडा घातला आहे. सॅलेसबरी पार्क येथे राहणार्या 42 वर्षीय महिलेने याप्रकरणी स्वारगेट पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरुन फसवणूक आणि आयटी ऍक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्वारगटे पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, या महिलेच्या पतीचे निधन झाले असून त्यांचा रिक्रुटमेंटचा व्यवसाय आहे. उच्च शिक्षित असलेल्या या महिलेची मुलगी कॉलेजमध्ये शिकायला आहे. पतीच्या निधनानंतर त्यांच्या व्यवसाय या महिलेने पुढे नेला. काही दिवसात मुलीचेही लग्न होणार म्हणून मुलीनेच किती दिवस एकटे आयुष्य काढणार चांगला जोडीदार मिळल्यास लग्न करुन टाक असा सल्ला दिला. त्यानंतर लग्नाला तयार झालेल्या या महिलेने शादी डॉट कॉम, मेट्रोमोनियल साईटवर लग्नाचे प्रपोजल टाकले. त्याला लंडन येथील रोमन बिझुस या व्यक्तीने लाईक केले. बिझुसचेही प्रपोजल या महिलेस मान्य झाले. त्यानंतर फोनवर बोलणे आणि इंटरनेटवर चॅटींग सुरु झाले. महिलाचा वाढदिवस त्याच महिण्यात आल्याने, त्याने वाढदिवसाचे गिफ्ट पाठवतो असे सांगितले. 12 जून ते 19 दरम्यान हा प्रकार सुरु होता.
12 जून रोजी लंडन येथून एका प्रियंका नामक महिलेचा त्यांना फोन आला. तुमच्यासाठी काही गिफ्ट आहेत. त्यासाठी तुम्हाला कस्टम ड्युटी म्हणून 15 हजार रुपये भरावे लागतील. बँक ऑफ अमेरिका येथून बोलत असल्याचे प्रियंकाने सांगितले. याची खात्री त्यांनी रोमन बिझुस याच्याकडे केली त्यानेही रक्कम भरुन टाक असे या महिलेला सांगितले. त्याने सांगितल्या प्रमाणे त्यांनी इंटरनेट बँकीग द्वारा दिलेल्या अकाऊंट नंबरवर ते पैसे भरलेही. त्या गिफ्टमध्ये लॅपटॉप, सोन्याचे, डामंडचे दागीने, आयफोन आणि काही रक्कम असल्याचे लंडन येथील प्रियंकाने सांगितल्या नंतर या महिलेला मोठा आनंद झाला आणि ती सांगेल त्या ठिकाणी पैसे भरत गेली. गिफ्ट बरोबर 15 हजार पाउंडची रोकड आहे. हे समजल्यावर कुठलही शहानिशा न करता आठ दिवसात तब्बल 42 लाख 92 हजार 325 रुपये वेळोवेळी त्यांनी अकाऊंटवर ट्रान्सफर केले. त्या लोकांची पैक्षाची मागणी काही थांबत नाही म्हणून सक्षम भेटून 2 लाख देण्याची तयारी दर्शवली. त्यावेळी आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर संबधीत महिलेने थेट पोलिस आयुक्तांना गाठले. शेवटी स्वारगेट पोलिस ठाण्यात गुन्हा याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस निरीक्षक राजमाने या प्रकणाचा तपास करत आहेत.