नवी मुंबई : अशोकपुष्प पब्लीकेशनच्या वतीने गेली पाच वर्ष नवी मुंबईत उद्योगश्री पुरस्कार सन्मान सोहळा आणि भारतीय व्यवस्थापन शास्त्राचे जनक छत्रपति शिवाजी महाराजांच्या सिद्धांताचा खरा वेध म्हणजे शिवाजी द मँनेजमेंट गुरु, या व्याख्यानाचे आयोजन केले जाते. या वर्षी २८ जुलै २०१५ रोजी संध्याकाळी ८.३० वाजता ,विष्णुदास भावे नाट्यगृह वाशी येथे हा सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमाला उद्योजक,मँनेजमेंटचे विद्यार्थी, शिक्षक तसेच शिवप्रेमी प्रेक्षकांची तुफान गर्दी होती.
या कार्यक्रमाचे औचित्य साधून समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. आमदार बच्चु कडू यांना अशोकपुष्प पब्लिकेशन चा विदर्भ आयकॉन्स २०१५ या पुरस्काराने गजल नवाज भीमराव पांचाळे , प्रा.नामदेवराव जाधव ,आमदार मंदाताई म्हात्रे , दैनिक केसरी चे कार्यकारी संपादक सुकृत खांडेकर,नवी मुबंई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष विकास महाडिक,मनसे चे नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे , उद्योजक निलेश साबळे व इतर मान्यवरांच्या उपस्थित सन्मानित करण्यात आले . तसेच उद्योगश्री पुरस्कार श्री तुकाराम दुधे व के. के म्हात्रे, उद्योजक कुमार कोकीळ , समाजभूषण पुरस्कार जयश्री दंडवते, रमेश त्रिपाठी,यांना हे पुरस्कार प्रदान करण्यात आला . रत्नकांत जगताप, नृत्य दिग्दर्शक रोहन पवार, अभिनेत्री मिनल बाळ,पांडुरंग गुरव, उद्योजक अजय कुडवा, नृत्य दिग्दर्शक आशिष त्रिपाठी,नवा बालगंधार च्या निर्माता क्षितीजा वाळके,अभिनेता मनिष कदम यांना त्यांनी दिलेल्या विविध क्षेत्रातील योगदान करिता यावेळी गौरविण्यात आले अशी माहिती कार्यक्रमाचे आयोजक उमेश चौधरी यांनी दिली.