नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाच्या अपंग समावेशित शिक्षण उपक्रमांतर्गत विशेष (अपंग) मुलांना आवश्यक साहित्य महापौर सुधाकर सोनवणे यांच्या हस्ते वाशी येथील नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्र. २८ येथे वितरीत करण्यात आले. याप्रसंगी महापौरांसोबत शिक्षण विभागाचे उपआयुक्त अंबरीश पटनिगीरे, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी योगेश हन्नुरकर आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
नवी मुंबई शहरातील प्रत्येक विशेष विद्यार्थ्याबाबत महानगरपालिकेची आपुलकीची भूमिका असून अशा प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षण व आवश्यक सुविधा पुरविण्यासाठी आम्ही कटीबध्द आहोत अशा शब्दात भावना व्यक्त करीत महापौर सुधाकर सोनवणे यांनी विशेष विद्यार्थ्यांच्या पालकांसोबत आम्ही कायम आहोत, त्यामुळे अशा पालकांनी आपल्या पाल्याला अधिकाधिक उमेदीने प्रोत्साहन देऊन शिक्षण द्यावे व त्याची चांगली जडण-घडण करावी असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाप्रसंगी १६ व्हिलचेअर, ०४ रोलेटर, ९ क्रचेस, १३ ट्रायसिकल आणि २३ कॅलिपर अशा आवश्यक वस्तू ५५ विशेष मुलांना वितरीत करण्यात आल्या.