नवी दिल्ली : अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरात एक धक्कादायक घटना उघडकीस आलीय. एका आईनंच आपल्या चिमुरड्याची हत्या करून त्याला बॅगेत भरलं आणि शॉपिंगला निघून गेली.
या प्रकरणात १८ वर्षांच्या टियोना रॉड्रिग्ज हिला पोलिसांनी अटक केलीय. शॉपिंगवर जाताना अडथळा नको म्हणून या महिलेनं आपल्याच चिमुरड्याची हत्या केली. या क्रूर आईनं यानंतर आपल्या मुलाचं मृत शरीर आपल्या बॅगेत भरून ती शॉपिंगसाठी बाहेर पडली.
या घटनेचा खुलासा तेव्हा झाला जेव्हा टियोना ज्या दुकानात शॉपिंगसाठी गेली होती त्या दुकानात चोरीच्या आरोपाखाली टियोनाला पकडण्यात आलं. यावेळी तिच्या बॅगीची तपासणी झाली.
तपासणी दरम्यान टियोनाच्या बॅगेत ८ पाऊंड म्हणजेच जवळपास साडे तीन किलोच्या चिमुरड्याचा मृतदेह सापडला. यामुळे एकच खळबळ उडाली.
हे प्रकरण सध्या कोर्टात सुरू आहे. वकिलांच्या म्हणण्यानुसार, दोन वर्षांपूर्वीही टियोना रॉड्रिग्ज हिला दुकानात चोरी करण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. परंतु, त्यानंतर मात्र हा आरोप मागे घेण्यात आला. वकिलांच्या म्हणण्यानुसार, टियोना ही जवळपास आठवड्याभरापासून मुलाला मारण्याचा प्लान करत होती. यासाठी त्यांनी काही पुरावेही सादर केले.
तर टियोना हिला तिच्या गर्भावस्थाही कळत नव्हती. आपल्याला मूल झालंय हेही तिच्या ध्यानात आलं नाही. तिच्या हातून जे काही घडलं ते नकळत घडलं असं बचाव पक्षाच्या वकिलांनी म्हटलंय.