नवी मुंबई : महानगरपालिकेच्या वतीने लोकमान्य टिळक पुण्यतिथी आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीप्रसंगी नवीन मुख्यालयातील ऍम्पी थियेटरमध्ये उपमहापौर अविनाश लाड यांच्या शुभहस्ते प्रतिमापूजन संपन्न झाले. याप्रसंगी नगरसेवक सुनिल पाटील, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त तथा संचालक डॉ. बाबासाहेब राजळे, उपआयुक्त तृप्ती सांडभोर, परिवहन समितीचे माजी सभापती उमाकांत नामवाड, माजी नगरसेवक प्रभाकर कांबळे व इतर मान्यवर उपस्थित होते.