चेन्नई : गेल्या काही दिवसांपासून भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहलीचा फॉर्म खालावलेला दिसत आहे. यावर मला माझ्या फलंदाजी आणखी परिश्रम घेण्याची गरज नाही. मी नेहमीच संघासाठी जबाबदारीने खेळतो असे मत कोहलीने व्यक्त केले आहे.
नुकत्याच ऑस्ट्रेलिया- भारत अ संघादरम्यान झालेल्या दुसर्या अनधिकृत सामन्यात विराटने प्रतिनिधित्व केले होते. या सामन्यात त्याने दोन डावात १६ आणि ४५ धावा केल्या.
या वर्षी भारत अधिक कसोटी सामनेही खेळलेला नाही. तसेच एकदिवसीय क्रिकेटमध्येही विराटची कामगिरी तितकीशी प्रभावी राहिलेली नाही. फेब्रुवारीपासून त्याला एकही शतक अद्याप झळकावता आलेले नाही.
एक फलंदाज म्हणून मी ज्या पद्धतीने खेळतो त्यासाठी मी जबाबदर असतो. तसेच प्रत्येक वेळी आपला संघ जिंकावा याच ईर्ष्येने खेळतो. त्यामुळे मला नाही वाटत मी माझ्या फलंदाजीसाठी विशेष प्रयत्न करावेत, असे कोहली म्हणाला.
१२ ऑगस्टपासून भारत श्रीलंका दौर्यावर जात आहे. या दौर्यात तीन कसोटी सामने होणार आहेत. या दौर्याबत बोलताना विराट म्हणाला, कसोटी कर्णधार या नात्याने पूर्णपणे मोठा दौरा असणार आहे. बांगलादेश दौर्यात केवळ एक कसोटी सामना झाला. हे माझ्यासाठी हे एक नवे आव्हान असणार आहे असे विराटने सांगितले.