कोलकाता : मुसळधार पावसाने पश्चिम बंगाल राज्याला झोडपून काढले आहे. दक्षिण बंगालला मुसळधार पावसाचा सर्वाधिक फटका बसला असून आतापर्यंत पावसामुळे राज्यातील ३९ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील सुमारे ३३ हजार नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आले आहे.
बंगालची राजधानी कोलकातामध्येही पावसाची संततधार सुरु आहे. मात्र अद्याप या भागात जिवितहानीचे वृत्त नाही. पावसाच्या संततधारेमुळे या भागात अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. सकाळी आठ वाजेपर्यंत कोलकातामध्ये ११७.४ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे दक्षिण बंगालसह हावडा, दक्षिण २४ पॅरागन, पूर्व मिदानपोर या जिल्ह्यांमध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.
उत्तर आणि दक्षिण कोलकातामधील अनेक रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. पुढील ४८ तास पावसाचा जोर कायम राहील असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.