* चांगल्या कामगिरीबदल केला सन्मान
नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत असलेल्या दिघा प्रभाग समितीत मलनिसारण वाहनचालक अजित सुतार यांची नेरूळ येथे बदली करण्यात आली आहे. मागील तीन वर्षापासून तत्परतेने काम केल्या बदल दिघा प्रभाग समितीचे विभाग अधिकारी गणेश आघाव यांनी त्यांच्या सहकार्यांनी त्यांचा सन्मान केला. एक कर्मचारी हा सेवेत असताना त्याने केलेल्या चांगल्या कामाबद्दल अशा प्रकारे सत्कार करून कर्मचायाचे मनोबल वाढविणे हीच सोजवळ भावना असल्याचे आघाव मार्गदर्शन करताना म्हणाले.
मल:निस्सारण वाहन म्हंटले की आपण नेहमीच नाक मुरडतो. पण पालिकेचे मलनिस्सारण वाहन चालक अजित सुतार त्याला अपवाद आहेत. कारण चांगली सेवा देने आणि मन मिळाहु पणा त्यांचा स्वभाव गुण. त्यामुळे एक वाहन चालक असतानाही त्याच्याकडे एका कुटुंबाप्रमाणे त्यांच्याकडे पाहिले जात. मुळचे नाविमुंबईकर असणारे अजित सुतार हे शिरवणे येथे राहतात. ८ वर्षापासून पालिकेच्या सेवेत कार्यरत राहणार्या अजित यांनी आपण नवी मुंबईच्या जडण घडणीचे स्वतः शिलेदार असून मला माझ्या कामाबद्दल आणि शहराबदल अभिमान असल्याची भावना दिघा प्रभाग समितीतून निरोप घेताना व्यक्त केली.
या कार्यक्रमाला दिघा एच प्रभाग समितीचे विभाग अधिकारी गणेश आघाव, अधीक्षक कैलाश वाघ, अधिकारी मनोहर सोनावणे, सुहास टकले सुधाकर वडजे, पाणी खात्याचे अधिकारी सचिन नामवाड, स्वछता निरीक्षक राजू बोरकर, उपस्वच्ता निरीक्षक विरेंद्र पवार, करनिरीक्षक राजश्री पाटील, रंजना साळवी, करनिरीक्षक सुहास महिंद उपस्थित होते.