भोपाळ : मध्य प्रदेशातील हरदा येथे मुंबई-वाराणसी कामायनी एक्स्प्रेसचे सात डबे आणि मुंबई- जबलपूर जनता एक्स्प्रेसचे शेवटचे पाच डब्बे माचक नदीच्या पुलावर रुळावरुन घसरले. हा भीषण अपघात मंगळवारी रात्री साडे अकराच्या सुमारास झाला. या दोन्ही रेल्वेचे काही डबे घसरुन थेट नदीत पडले.
या भीषण अपघातात आतापर्यंत 24 जणांचा मृत्यू झाला. यात नऊ पुरूष, 10 महिला आणि पाच लहान मुलांचा समावेश आहे, अशी माहिती हरडा येथील जिल्हाधिकारी रजनिश श्रीवास्तव यांनी दिली. मात्र प्रत्यक्षदर्शीच्या माहितीनुसार, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
मुसळधार पावसामुळे नदीला पुर आला होता. रेल्वे रुळांवरुन पाणी वाहत होते. यादरम्यान कामयानी एक्स्प्रेसचे 11 डबे घसरले. तर राजेंद्रनगरहून मुंबईला येणार्या जनता एक्स्प्रेसचे पाच डबेही याच पुलावरून घसरले.
रात्री उशिरा हा अपघात घडल्याने तत्काळ मदतकार्य पोहोचण्यास उशीर झाला. मात्र अपघाताचे वृत्त समजताच घटनास्थळी रेल्वे प्रशासन आणि मध्य प्रदेश सरकारतर्फे तातडीने एकत्रितपणे मदतकार्य सुरू करण्यात आले. एनडीआरएफचे एक पथक, डीआरएम, आरपीएफ जवान घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी बचाव व मदतकार्य युद्ध पातळीवर सुरू करण्यात आल्याची माहिती रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी ट्विटरवरून दिली आहे.
दरम्यान, मदतकार्य जवळजवळ संपले असून या दुर्घटनेत 25 जणांचा मृत्यू झाला आहे. तर सुमारे 300 हुन अधिक प्रवाशांना सुरक्षित वाचविण्यात यश आले आहे.
रेल्वे मंत्रालयाकडून मृतांच्या नातेवाईकांना दोन लाख रुपये, गंभीर जखमींना 50 हजार रुपये आणि किरकोळ जखमींना 25 हजार रुपयांची मदत जाहीर केल्याची माहिती पश्चिम मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी पियूष माथूर यांनी दिली.
रेल्वे रुळावर पाणी असल्यामुळे पूल पाण्याखाली गेला होता. यामुळे कामायनी एक्स्प्रेसचे शेवटचे डब्बे पटरीवरून खाली उतरले. तर त्याचवेळी दुसर्या रेल्वे ट्रॅकवरून जाणार्या जनता एक्स्प्रेसचे इंजिन आणि काही डब्बे रुळावरून घसरल्याचे माथूर यांनी सांगितले.
** मध्य रेल्वेचे हेल्पलाईन क्रमांक पुढीलप्रमाणे –
* सीएसटी (मुंबई) – 022-22694040
* एलटीटी (मुंबई) – 022- 25280005
* ठाणे- 022-25334840
* कल्याण- 0251- 2311499
* हरदा- 09752460088
* भोपाळ- 075540016090
* इटारसी- 07572241920
* बिना- 07580222052
या अपघातानंतर मुंबईला येणार्या तसेच मुंबईहून जाणार्या काही गाड्या अन्य मार्गाने वळवण्यात आल्या आहेत.
व्हाया भुसावळ-सुरत-बैरागड-निशातपुरा
* 12147 कोल्हापूर -हजरत निझामुद्दीन एक्स्प्रेस व्हाया भुसावळ-सुरत
* 11077 पुणे -जम्मू तावी झेलम एक्स्प्रेस
* 12137 सीएसटी-फिरोझपूर पंजाब मेल
* 11015 एलटीटी – गोरखपूर कुशीनगर एक्स्प्रेस
* 11057 सीएसटी-अमृतसर एक्स्प्रेस व्हाया जळगाव, भोपाळ
* 12617 एर्नाकुलम – हजरत निझामुद्दी मंगला एक्स्प्रेस
व्हाया भुसावळ-नागपूर-इटारसी
* 12322 सीएसटी-हावडा मेल व्हाया अलाहाबाद
* 12141 एलटीटी- राजेंद्रनगर एक्स्प्रेस
* 11093 सीएसटी – वाराणसी महानगरी एक्स्प्रेस
व्हाया इटारसी-नागपूर-भुसावळ
* 11078 जम्मू तावी-पुणे झेलम एक्स्प्रेस
* 12142 राजेंद्रनगर -एलटीटी एक्स्प्रेस
व्हाया भोपाळ, नादियाड, भुसावळ
* 12597 गोरखपूर-सीएसटी एक्स्प्रेस
व्हाया निशातपुरा-बैरागड-जळगाव
* 12716 अमृतसर-हजुर साहिब नांदेड एक्स्प्रेस
व्हाया निशातपुरा-बैरागड-वसई रोड
* 12780 हजरत निझामुद्दीन -वास्को एक्स्प्रेस
शॉर्ट टर्मिनेटेड
* 51157 भुसावळ-इतारसी पॅसेंजर खंडाळाजवळ
व्हाया भुसावळ -नागपूर-इटारसी
* 11015 एलटीटी-गोरखपूर कुशीनगर एक्स्प्रेस
* 11057 सीएसटी-अमृतसर एक्स्प्रेस
* 12322 सीएसटी-हावडा मेल व्हाया अलाहाबाद
व्हाया इटारसी-नागपूर-भुसावळ
* 12321 हावडा -सीएसटी मेल व्हाया अलाहाबाद