संजय बोरकर : ९८६९९६६६१४
नवी मुंबई : भारताचा फरार आरोपी ललीत मोदी याला मदत केल्याप्रकरणी परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज आणि राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे तर व्यापम घोटाळा प्रकरणी मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांचा राजीनामा मागणार्या लोकसभेतील कॉंग्रेस पक्षाच्या २५ खासदारांना दि. ३ ऑगस्ट २०१५ रोजी ५ दिवसांकरीता निलंबीत करण्याची घटना अत्यंत निषेधार्ह आहे.
केंद्रात मोदी सरकार आल्यापासून सातत्याने लोकशाही, संवैधानिक संस्था आणि इतर महत्वपुर्ण संस्थांमध्ये हुकूमशाही कारभार सुरू असल्याचे दिसून येते. भ्रष्टाचाराविरूध्द कठोर कारवाईची मागणी करणार्या कॉंग्रेस पक्षाच्या २५ खासदारांचे निलंबन याच हुकूमशाहीचा एक नमुना आहे. भारतीय जनता पक्षाच्या दडपशाहीविरूध्द संपूर्ण देशामध्ये संतापाची तीव्र लाट उसळली आहे.
या आंदोलनांतर्गत गुरूवारी सकाळी ११.०० वाजता कोकणभवन, बेलापूर, नवी मुंबई या ठिकाणी नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या वतीने निदर्शने करण्यात आली. या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही मोदी सरकारच्या हुकूमशाहीचा आणि कॉंग्रेस पक्षाच्या २५ खासदारांच्या निलंबनाचा निषेध केला आहे. त्याचप्रमाणे या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज, राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चैहान यांच्या राजीनाम्याची मागणी करीत आहोत.
वरील निवेदन कोकण विभागीय आयुक्त यांच्यावतीने राजीव निवतकर, उपायुक्त सामान्य प्रशासन, कोकण विभाग यांनी स्विकारले. त्यावेळी नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या शिष्ट मंडळाने अशी मागणी केली की, कॉंग्रेस पक्षाच्या वतीने आज करण्यात आलेल्या निदर्षनाबाबत व आपण दिलेल्या निवेदनातील मागणींच्या अनुशंगाने आपण आपला अहवाल राज्य व केंद्र शासनाला पाठविण्यात यावा.
तत्पुर्वी कोकण भवन येथील गेटसमोर नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या वतीने सोबत जोडलेल्या निवेदनातील मुद्यांना अनुसरून केंद्रातील भाजपा सरकारचा, पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांच्या दादागिरीशाहीच्या निषेध व्यक्त करणााया घोषणा कार्यकर्त्यांमार्फत देण्यात आल्या. यावेळी या निदर्शनामध्ये नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष दशरथ भगत यांच्यासह, ठाणे लोकसभा युवा कॉंग्रेसचे अध्यक्ष निशांत भगत, जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे पदाधिकारी सुरेश नायडु, विठ्ठलराव यादव, निजामअली शेख, बाबासाहेब गायकवाड, रविंद्र सावंत, रामेष्वरदयाल शर्मा, बन्सी डोके, संतोश सुतार, रमेश मोरे, विष्णु मेढकर, विजय वाळुंज, सचिन शिंदे, संतोश कांबळे, युवक कॉंग्रेसचे पदाधिकारी तौसिफ अली शेख, बालाजी यादव, शार्दुल कौषिक, योगेष ठोसर व महिला भगिनी आदि सहभागी होते.