नवी मुंबई : महानगरपालिकेच्या परिवहन समिती व आठ विशेष समिती सभापतीपदासाठी झालेल्या निवडणुकीत पिठासन अधिकारी तथा रायगडच्या जिल्हाधिकारी श्रीम. शितल उगले यांनी परिवहन समिती सभापतीपदी साबू डॅनियल यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले.
क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम समिती सभापतीपदी प्रकाश मोरे आणि पाणी पुरवठा व मलनि:स्सारण समिती सभापतीपदी अशोक गुरखे यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले. सर्व नवनिर्वाचित नऊ समिती सभापतींचे पिठासन अधिकारी तथा रायगडच्या जिल्हाधिकारी श्रीम. शितल उगले यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.
महिला व बालकल्याण समिती सभापती पदासाठी झालेल्या निवडणुकीत ऍड. अपर्णा गवते यांना ८ तसेच श्रीम. नंदा काटे यांना ४ मते मिळाल्याने ऍड. अपर्णा गवते यांची सभापतीपदी निवड घोषित करण्यात आली.
आरोग्य परिरक्षण समिती सभापती पदासाठी झालेल्या निवडणुकीत श्रीम. पुनम पाटील यांना ७ तसेच रामदास पवळे यांना ५ मते मिळाल्याने श्रीम. पुनम पाटील यांची निवड झाल्याचे घोषित करण्यात आले.
समाजकल्याण व झोपडपट्टी सुधार समिती सभापती पदासाठी झालेल्या निवडणुकीत श्रीम. मोनिका पाटील यांना ८ तसेच जगदिश गवते यांना ५ मते मिळाल्याने श्रीम. मोनिका पाटील सभापती म्हणून निवडून आल्या.
विधी समिती सभापती पदासाठी झालेल्या निवडणुकीत ऍड. भारती पाटील यांना ८ तसेच काशिनाथ पवार यांना ४ मते मिळाल्याने ऍड. भारती पाटील सभापती पदी निवडून आल्याचे घोषित करण्यात आले.
विद्यार्थी व युवक कल्याण समिती सभापती पदासाठी झालेल्या निवडणुकीत गिरीष म्हात्रे यांना ८ व श्रीम. मेघाली राऊत यांना ५ मते मिळाली आणि गिरीष म्हात्रे बहुमतांनी निवडून आले.
उद्यान व शहर सुशोभिकरण समिती सभापती पदासाठी झालेल्या निवडणुकीत श्रीम. स्वप्ना गावडे यांना ८ तसेच श्री. विशाल ससाणे यांना ४ मते मिळाल्याने श्रीम. स्वप्ना गावडे बहुमताने निवडून आल्या.
यामध्ये ८ विशेष समित्यांचे उपसभपती पदासाठी झालेल्या निवडणुकीत आरोग्य परिरक्षण समिती उपसभापती गणेश म्हात्रे, महिला व बालकल्याण समिती उपसभापती श्रीम. संगिता बोर्हाडे, पाणीपुरवठा व मलनि:स्सारण समिती उपसभापती श्रीम. उषा भोईर, समाजकल्याण व झोपडपट्टी सुधार समिती उपसभापती श्रीम. सुरेखा नरबागे, विधी समिती उपसभापती विशाल डोळस, क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम समिती उपसभापती श्रीम. तनुजा मढवी, विद्यार्थी व युवककल्याण समिती उपसभापती श्रीम. पुजा मेढकर, उद्यान व शहर सुशोभिकरण समिती उपसभापती – श्रीम. श्रध्दा गवस यांची निवड झाल्याचे संबंधित सभापतींनी पिठासन अधिकारी म्हणून घोषित केले.
नवनिर्वाचित सभापती व उपसभापती यांचे महापौर सुधाकर सोनवणे, उपमहापौर अविनाश लाड, स्थायी समितीच्या सभापती सौ. नेत्रा शिर्के यांचेसह माजी खासदार संजीव नाईक, माजी महापौर सागर नाईक, माजी उपमहापौर रमाकांत म्हात्रे यांनी त्याचप्रमाणे महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे व अधिकारी वर्गाने अभिनंदन केले.