नवी मुंबई : माहितीच्या अधिकाराबाबत अभियांत्रिकी विभागातील अधिकारी/कर्मचारी वृंदाला अद्ययावत ज्ञान असावे यादृष्टीने नॅशनल कॉन्सिल फॉर ट्रेनिंग ऍन्ड सोशल रिसर्च, नवी दिल्ली या संस्थेच्या माध्यमातून तीन दिवसीय माहिती अधिकार अधिनियम, २००५ बाबत अंतर्गत प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली, शहर अभियंता मोहन डगांवकर यांच्या माध्यमातून अभियांत्रिकी अधिकारी/कर्मचारी वृंदासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असून यापूर्वी अभियांत्रिकी क्षेत्रातील अद्ययावत माहिती मिळण्याच्या दृष्टीने दोन कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी अतिरिक्त शहर अभियंता सुरेंद्र पाटील उपस्थित होते.
माहितीच्या अधिकाराच्या अनुषंगाने कायद्याचे तसेच केस स्टडीज व कोर्ट केसेस यांची माहिती त्याचप्रमाणे रेकॉर्ड मॅनेजमेंट सिस्टीममधील सुधारणा या विषयानुरुप विविध तज्ज्ञ व्यक्तींची व्याख्याने कार्यशाळेमध्ये आयोजित करण्यात आली आहेत.
०५ ऑगस्ट पासून सुरु झालेल्या या कार्यशाळेत पहिल्या दिवशी कॉन्स्टिटयुशनल डायमेन्शस् ऑफ राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट २००५, सायलेंट फिचर्स ऑफ राईट टू इन्फॉर्मेशन क्ट २००५, रोल ण्ड रिस्पॉन्सिबिलीटिज ऑफ गव्हर्नमेंट ऑफिसर्स ट, व्हरीड लेव्हल्स अंडर आरटीआय २००५ या विषयांवर विजयकुमार पांडे यांची माहितीप्रद व्याख्याने झाली तसेच कॅप्टन निलेश कुमार यांनी स्ट्रेस ऍण्ड स्ट्रेस मॅनेजमेंट, मोटिव्हेशन याबाबत उत्तम मार्गदर्शन केले.
६ ऑगस्टच्या दुसर्या सत्रात माहिती अधिकार अधिनियमांन्वये कलम ४(१) (A) नुसार रेकॉर्ड मॅनेजमेंट, प्रोक्टिव्ह डिसक्लोझर ऑफ इन्फॉर्मेशन ण्ड इटस् सिग्निफिकन्स, हॅन्डलिंग ऑफ आरटीआय प्लिकेशन्स ण्ड डिस्पोझल विदिन टाईम फ्रेम, एक्झम्शन ऍण्ड थर्ड पार्टी इन्फॉर्मेशन या विषयांवर अनिल सूद यांचे त्याचप्रमाणे कॅप्टन निलेश कुमार यांचे टाईम मॅनेजमेंट व इंटरपर्सनल रिलेशनशीप या विषयावर उद्बोधक व्याख्यान झाले.
उद्या समारोपाच्या सत्रात प्रकाश शेजवळ हे अनुभवसंपन्न व्याख्याते आरटीआय ऍक्ट २००५ ची प्रभावी अंमलबजावणी आणि त्यासाठीच्या महत्त्वपूर्ण बाबी त्याचप्रमाणे बेस्ट प्रॅक्टिसेस ऑफ आरटीआय २००५, कॉनफ्लिक्ट मॅनेजमेंट, पर्सेनॅलिटी डेव्हलपमेंट त्याचप्रमाणे समन्वय आणि सामुहिकता वृध्दी या विषयावर व्याख्याने देणार आहेत. समारोपाच्या सत्रात चर्चेव्दारे माहितीचा अधिकार विषयक विविध प्रश्नांचे समाधानकारक निराकरण केले जाणार असून महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यशाळेचा उपयोग माहितीचा अधिकार याविषयी सकारात्मक दृष्टीकोन वाढीसाठी तसेच सुव्यवस्थित कार्यालयीन कामाकाजासाठी होईल असा विश्वास शहर अभियंता मोहन डगांवकर यांनी व्यक्त केला आहे.