मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या ‘मातोश्री’वर शस्त्र घेऊन आलेल्या एका व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या व्यक्तीजवळ चाकू आणि ब्लेड आढळलं आहे. या प्रकरणी खेरवाडी पोलिस मातोश्रीवर शस्त्र घेऊन जाणार्याची चौकशी करत आहेत.
राममिलन शर्मा असे त्याचे नाव आहे. कॉंग्रेसचे नगरसेवक अनिल पाटणकर आज शिवसेनेत प्रवेश करत आहेत. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत ‘मातोश्री’वर त्यांचा पक्षप्रवेश होत आहे. मात्र पाटणकर यांच्या कार्यकर्त्यांसोबतच्या गर्दीत एक संशयित व्यक्ती आढळला. त्याच्याकडे चौकशी केली असता, चाकू आणि ब्लेड असल्याचं समोर आलं.
मात्र आपण व्यवसायाने न्हावी असल्याने चाकू बाळगत असल्याचं संशयिताने सांगितलं आहे.