हैदराबाद : वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकऱणी भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झाला दंड भरावा लागला.
सानियाच्या कारवर लावण्यात आलेली नंबरप्लेट वाहतुकीच्या नियमानुसार नसल्याने तिला हैदराबाद वाहतूक पोलिसांनी २०० रुपयांचा दंड ठोठावला.
जुब्ली हिल परिसरात गाड्यांची तपासणी केली जात असताना ही बाब पोलिसांच्या लक्षात आली. सानियाच्या कारवरील नंबरप्लेटमुळे वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन असल्याचे सांगत पोलिसांनी तिच्याकडून दंडवसुली केली.
विम्बल्डन स्पर्धेत महिला दुहेरीचा किताब पटकावणारी सानिया तेलंगणाची ब्रँड ऍम्बेसिडेर आहे.