जकार्ता : जागतिक क्रमवारीत १३ व्या स्थानी असलेल्या भारताच्या पी.व्ही.सिंधूने जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत विजयी सलामी दिली. सिंधूने डेन्मार्कच्या लिनेचा ११-२१, २१-१६, २१-१७ असा पराभव करत स्पर्धेच्या तिसर्या फेरीत प्रवेश केला.
पहिल्या गेममध्ये डेन्मार्कच्या लीने वर्चस्व गाजवले. आक्रमक खेळ करत लीनेने सुरुवातीला ६-१ अशी आघाडी घेतली. त्यानंतर अखेरपर्यंत तिने ही आघाडी टिकवण्यात यश मिळवले आणि पहिला गेम आपल्या नावे केला.
दुसर्या गेममध्ये सिंधूने लीनेला चांगली लढत दिली. ७-७ अशी बरोबरी केल्यानंतर सिंधूने दोन गुण मिळवत ही आघाडी ९-७ ने वाढवली. त्यानंतर सातत्यपूर्ण खेळ करत सिंधूने दुसरा गेम जिंकला.
तिसर्या आणि निर्णायक गेममध्ये लीनेने सुरुवातीला ४-१ अशी आघाडी घेतली. मात्र सिंधूने दमदार खेळत करत ९-९ पर्यंत बरोबरी नेली. त्यानंतर सिंधूने सलग पाच गुण जिंकले आणि लीनेवर १४-९ अशी आघाडी घेतली. यावेळी लीनेने खेळात परतण्याचा पुरेपूर प्रयत्न केला मात्र सिंधूने जबरदस्त खेळाच्या जोरावर तिसरा गेम जिंकला आणि पुढील फेरीत प्रवेश केला.
तिसर्या फेरीत सिंधूची लढत चीनच्या ली झ्युरेईशी होणार आहे.