नवी दिल्ली : आधार कार्डप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला स्पष्ट बजावले आहे. तुमचे आधार कार्ड सक्तीचे नाही, याबाबत तशी जाहिरात करा, असा आदेश सर्वोच्य न्यायालयाने दिलाय.
गॅस सबसिडी (एलपीजी), रेशनचे धान्य तसेच अन्य अनुदानासाठीच आधार कार्डची सक्ती करण्यात येत आहे. मात्र, ही सक्ती करता येणार नाही. सरकारच्या अन्य योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड बंधनकारक नाही, असा स्पष्ट निर्वाळा सर्वोच्च न्यायालयालयाने दिलाय. त्यामुळे आधार कार्डबाबत केंद्र सरकारला मोठा झटका बसला आहे.
काही ठिकणी आधार कार्डासाठी पैसे घेतले गेल्याचे प्रकार उघड झाले आहेत. तर अनेक ठिकाणी आधार कार्डची सक्ती करण्यात येत आहे. आता ही सक्ती करण्यात येणार नाही. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे सर्व सामान्यांना दिलासा मिळाला आहे.