बेलापूरपासून भाजपाच्या महासंपर्क अभियानाची सुरुवात
नवी मुंबई: ऑगस्ट या क्रांती दिनानिमित्त भारतीय जनता पार्टीच्या महासंपर्क अभियानाची सुरुवात बेलापूर विधानसभा मतदार संघातून
करण्यात आली. यानिमित्त आमदार मंदा म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली तुर्भे येथे कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्यात भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस तथा नवी मुंबई प्रभारी संजय उपाध्याय यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
या मेळाव्यास भाजपाचे शेकडो महिला आणि पुरुष कार्यकर्ते उपस्थित होते. या मेळाव्याअंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि बेलापूरच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या कार्याचा आढावा घेण्यात आला. यावेळी सिडको-एमआयडीसी प्रकल्पग्रस्त शेतकरी कृती समितीचे कार्याध्यक्ष डॉ. राजेश पाटील आणि विजय
घाटे यांनी आ. मंदाताई म्हात्रे यांच्या कार्याचा आढावा मांडला. तर नवी मुंबईमध्ये भारतीय जनता पार्टीचे जास्तीत जास्त सदस्य नोंदणी करण्याचे आवाहन आ. मंदाताई म्हात्रे यांनी पदाधिकारी-कार्यकर्त्यांना केले.
याप्रसंगी भाजपाचे नवी मुंबईतील नगरसेवक रामचंद्र घरत, सुनील पाटील, दिपक पवार, उषा कृष्णा पाटील, दयावंती शेवाळे, माजी स्थायी समिती सभापती संपत शेवाळे, गोपाळराव गायकवाड, मारुती भोईर, एकनाथ मगडवार, सिंह-विक्रम पराजुली आदि पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.