*** आमदार नरेंद्र पवारांचे कल्याणकरांना आवाहन
*** कल्याणात होणार सामुहिक राष्ट्रगीताचा जयघोष
गणेश पोखरकर
कल्याण : देशासाठी ५२ सेकंद देणार का ? असे आवाहन करीत भाजपा प्रदेश सचिव आमदार नरेंद्र पवार यांनी कल्याणकरांना कोड्यात टाकले होते. हे कोडे नाही, तर राष्ट्राभिमान व्यक्त करण्याचे निमित्त असल्याचे भाजपा प्रदेश सचिव आमदार पवार यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
बुधवारी कल्याण येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने भाजपा प्रदेश सचिव आमदार नरेंद्र पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी त्यांच्या संकल्पनेतून, भाजपा कल्याण जिल्ह्याच्यावतीने अगदी अनोख्या पद्धतीने स्वातंत्रदिन साजरा करणार असल्याचे सांगितले.
नागरीकांनी याकार्यक्रमात उस्फुर्त सहभाग नोंदवावा म्हणून ५२ सेकंद देशासाठी देणार का ? असे कोडे घातले असे ते म्हणाले. १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनी कल्याणकरांनी आपल्या राष्ट्राभिमान व्यक्त करण्यासाठी आपल्याला शक्य होईल अशा ठिकाणी, अथवा कल्याण भाजपा जिल्ह्याच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या शहरातील ५६ ठिकाणी सकाळी १०.३० च्या ठोक्याला सामुहिक राष्ट्रगीताचा जयघोष करावा असे आवाहन कल्याण शहराचा एक लोकप्रतिनिधी म्हणून करीत असल्याचे त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना स्पष्ट केले.
आपल्या राष्ट्राचे लैकिक वाढवणारे राष्ट्रगीत म्हणण्यास अधिकृतरीत्या ५२ सेकंदांचा अवधी लागतो. हीच तुमच्या आयुष्यातील ५२ सेकंद तुम्ही स्वातंत्र्यदिनी देशासाठी देऊन, एकसंघ होऊन कल्याणकरांनी राष्ट्रगीताचा जयघोष करावा असे आमदार पवार यांनी स्पष्ट केले. या निमित्ताने नागरीकांनी विविधतेत एकता हि शिकवण देणार्या आपल्या राष्ट्राचा एकत्रित येऊन बहुमान वाढवूया असे सांगितले. कल्याण भाजपा जिल्ह्याच्यावतीने पक्षाचे जिल्ह्याचे पदाधिकारी आणि हजारो कार्यकर्ते शहरातील तब्बल ५६ ठिकाणी सामुहिक राष्ट्रगीताचा जयघोष करणार आहे. यामध्ये देखील नागरीकांनी सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले. यामध्ये प्रामुख्याने कल्याण पश्चिमेतील उंबर्डे गावातील नेटकरया चौक, श्री कॉम्प्लेक्समधील कै. विशाल भोईर चौक, अग्रवाल कॉलेज चौक गंधारे, निक्कीनगर चौक गंधारे, वायले नगर चौक, वसंत चौक, स्व. रविकांत वायले चौक (पोदार स्कूल), खडकपाडा चौक, गोदरेज चौक, गोदरेज हील चौक, गौरीपाडा तलाव, बिर्ला कॉलेज चौक, संदीप हॉटेल चौक, सिनेमक्स चौक, योगीधाम चौक, प्रेम पेट्रोल पंप चौक, कमिशनर बंगला चौक, सिंदिगेट चौक, कर्णिक रोड चौक, यशवंत मैदान, संतोषी माता, संहजानंद चौक, शिवाजी चौक, शंकरराव चौक, अहिल्याबाई चौक, गांधी चौक, बाजारपेठ चौक, दुधनाका चौक, लालचौकी, आधारवाडी चौक, वाडेघर चौक, दुर्गाडी चौक, पारनाका चौक, बैलबाजार चौक, वाणी विद्यालय चौक, जोशी बाग चौक, दिपक हॉटेल चौक, गणपती चौक (काळा तलाव), भारताचार्य चौक, बेतूरकर पाडा चौक (क्वालिटी कंपनी) रामबाग / मालवीय चौक, मधुरीमा चौक, गजानन महाराज मंदिर / सुंदर नगर चौक, इंदिरा नगर झोपडपट्टी / पोर्णिमा चौक, सर्वोदय मॉल चौक, त्याच प्रमाणे पाटीदार हॉल चौक (शहाड फाटक), वडवलीगणपती मंदिर चौक, अटाळी मारुती मंदिर, एन.आर.सी.गेट चौक, शिवाजी नगर चौक (मोहोने), जोशी शाळा शनिवार नगर चौक (मोहोने), तरे कॉम्प्लेक्स (मोहोने), उंबर्णी चौक, मांडा (पू.) स्टेशन, मांडा (प.) स्टेशन, गणपती मंदिर टिटवाळा आदी विभागात हा कार्यक्रम उत्साहाने साजरा करण्यात येणार आहे. कल्याण शहरात या पद्धतीने पहिल्यांद्याच अनोख्या आणि भव्य स्वरूपात स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात येणार आहे. यामुळे उत्साहाने कोड्याचे उत्तर शोधणार्या कल्याणकरांना एक अनोखा उपक्रम अनुभवता येणार असल्याचे त्यांनी सांगितले.