*** केडीएमसी आयुक्त ई. रवींद्रन यांची धडक कारवाई
*** आमदार नरेद्र पवारांनी व्यक्त केले समाधान
गणेश पोखरकर
कल्याण : रस्त्यावर बस्तान मांडलेले फेरीवाले, ओसंडून वाहणार्या कचराकुंड्या आणि गर्दुल्यांचा उच्छाद अशा चक्र्व्हुहात सापडलेल्या कल्याणकरांना बाहेर काढण्याचा पहिलाच यशस्वी प्रयत्न नवनियुक्त आयुक्त ई. रवींद्रन बुधवारी १२ ऑगस्ट रोजी केला. आयुक्त रवींद्रन यांच्या दबंग कार्यप्रणालीमुळे धास्तावलेल्या पालिका अधिकार्यांनी त्यांच्या आदेशावरून धडक मोहीम राबवून स्टेशन परिसर चकाचक केला. यामध्ये जेसीबीच्या साह्याने अनिधिकृत टपर्या निसाकर्षित करून फेरीवाल्यावर धडक कारवाई करण्यात आली. त्याच प्रमाणे परिसराची स्वच्छता करण्यात आली. येथील बेकायदेशीर प्रकारामुळे घुसमट होणार्या कल्याणकरांना मोकळा श्वास घेता यावा आणि स्टेशन परिसर चकाचक व्हावा याकरीता भाजपा प्रदेश सचिव आमदार नरेंद्र पवार सातत्याने पाठपुरावा करीत होते. या दबंग कारवाईमुळे आमदार पवार यांनी समाधान व्यक्त केले असून आयुक्त रवींद्रन यांनी करून दाखविले असे गौरवोद्गार काढले.
अनधिकृत टपर्या, रस्त्यावर बिनधक्तपणे बस्तान मांडलेले फेरीवाले आणि अस्वच्छ परिसर, गर्दुल्यांचा उच्छाद अशी आळोख कल्याण स्टेशन परिसराची झाली होती. या एकूण प्रकारामुळे चाकरमानी आणि कल्याणकरांना फार त्रास सहन करावा लागत होता. यामुळे वाहतूक कोंडी होऊन वाहतूक नियोजनाचा प्रश्न ऐरणीवर आला होता. याबाबत ही परिस्थिती बदलण्यासाठी आमदार नरेंद्र पवार यांनी रेल्वे पोलीस, वाहतूक पोलीस, रेल्वे प्रशासन, स्थानिक महात्मा फुले पोलीस, महापालिका प्रशासन यांच्या समन्वय बैठका घेऊन प्रयत्न केला. त्याच प्रमाणे स्टेशन परिसर स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी सहकार्य न करणार्यांना विरोधात न्यायालयीन प्रक्रियेचा अवलंब करून नोटीसा दिल्या. यामाध्यमातून शहरवासीयांची या परिस्थितून सुटका करण्यासाठी पाठपुरावा सुरु असतना केडीएमसीचे नवनियुक्त आयुक्त रवींद्रन यांनी धडक मोहीम राबवून कल्याण शहर चकाचक करण्याचे अश्वासन दिले होते. आमदार पवार यांच्या पाठपुराव्याची दाखल घेत आयुक्तांच्या आदेशानुसार सिटीला स्मार्ट करण्यासाठी बुधवारी दुपारी प्रभाग क्षेत्र अधिकारी भरत जाधव यांच्या पथकाने मोठ्या प्रमाणात कारवाई करीत कल्याण स्टेशन परिसर चकाचक केला. यामध्ये दोन पथकाच्या मदतीने ही व्यापक कारवाई करण्यात आली असून संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत तब्बल २२ अनधिकृत टपर्यांवर कारवाई करीत जेसीबीच्या साह्याने त्या तोडण्यात आल्या. त्याचप्रमाणे फेरीवाल्यावर कारवाई करीत त्यांना हि हटवण्यात आले असून स्टेशन परिसर नागरीकांसाठी मोकळा करण्यात आला. त्याच प्रमाणे ओसंडून वाहणार्या कचर्यांची देखील तत्काळ विल्हेवाट लावण्यात आली.
दरम्यान या सक्षम कारवाई बाबत आमदार नरेंद्र पवार यांनी आयुक्तांचे आभार मानले असून समाधान व्यक्त केले आहे. ही कारवाई सातत्यपूर्ण करून कल्याण डोंबिवली शहरांना स्मार्ट करण्यासाठी शहराचा संवेदनशील लोकप्रतिनिधी म्हणून मी कायम आयुक्तांच्या पाठीशी असेल अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.