पंकजांना अजित पवारांचा टोला
मुंबई : परभणीत दुष्काळाच्या दौर्यावर असताना महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे-पालवे यांची चप्पल त्यांच्या कर्मचार्यांने उचल्याने राष्ट्रीवादीचे नेते अजित पवार यांनी पंकजा यांना टोला लगावलाय. स्वतःची चप्पल स्वतः हातात घ्यावी, असे मत व्यक्त केलेय.
राजकीय नेत्यापुढं पुढे पुढे करणारे अनेक असतात. यापूर्वी इतिहासात अशा घटना घडल्या आहेत. त्यामुळे गरज असेल तर आपण स्वतःची चप्पल हातात घ्यावी, हे माझ मत आहे, अजित पवार म्हणालेत.
पंकजा मुंडे-पालवे यांनी काल दुष्काळी भागाच्या दौरा केला. त्यावेळी त्यांच्या चपला त्यांच्या कर्मचार्याने उचलल्याचे समोर आल्य आहे. पंकजा यांनी परभणी जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागाचा दौरा केला, त्यावेळी चिखल असलेल्या रस्त्यावरून जाताना चप्पल काढून ठेवली. ही चपल कर्मचार्याला हातात घ्यावी लागली होती.