संजय बोरकर : ९८६९९६६६१४
नवी मुंबई : जुईनगर सेक्टर २३ येथील महापालिका शाळा क्रं. १७ येथे १५ ऑगस्ट रोजी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन केले आहे.
महापालिका प्रभाग क्रं. ८३च्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या नगरसेविका सौ. तनुजा श्रीधर मढवी यांची क्रिडा व सांस्कृतिक समितीच्या उपसभापतीपदी निवड झाल्याबद्दल या आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेअर्ंतगत सुश्रुषा हार्ट केअर आणि स्पेशॉलिटी हॉस्पिटलच्या यांच्या माध्यमातून दुपारी २ ते ५ या वेळेत स्थानिक रहीवाशांकरता या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिरामध्ये ईसीजी, रक्त तपासणी, मधुमेह चाचणी, टीएमटी, जनरल चेकअप यासह विविध तपासण्या केल्या जाणार आहेत. गरीब वर्गातील पिवळ्या व केशरी रेशनकार्डधारक लोकांनी सोबत शिधापत्रिका आणल्यास शिबिरातच हद्याची तपासणी व शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार आहे.
या शिबिराचा प्रभागातील रहीवाशांनी मोठ्या संख्येने सहभागी होवून लाभ घ्यावा असे आवाहन नगरसेविका सौ. तनुजा श्रीधर मढवी यांनी केले आहे.