सुजित शिंदे : 9619197444
नवी मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रभाग 85 आणि 86च्या वतीने नागपंचमी सणानिमित्त बुधवार, दि. 19 ऑगस्ट रोजी नागपंचमी उत्सव 2015चे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती प्रभाग 85च्या राष्ट्रवादी काँग्र्रेसच्या नगरसेविका सौ. सुजाता सुरज पाटील यांनी दिली.
नेरूळ सेक्टर 12 येथील झुलेलाल मंदीरामध्ये दुपारी 2 ते सांयकाळी 6 या वेळेत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमामध्ये नागदेवतेचे पुजन, पोथीवाचन व आरती, पारंपारिक नृत्य, फेरांची गाणी, विविध स्पर्धा आदी कार्यक्रमांचा समावेश आहे. या कार्यक्रमाला स्थायी समिती सभापती सौ. नेत्रा शिर्के, उद्यान व शहर सुशोभीकरण समितीच्या सभापती अॅड. सौ. सपना गावडे-गायकवाड, नगरसेविका सौ. रूपाली भगत, माजी नगरसेविका सौ. स्नेहा पालकर, सौ. माधुरी सुतार, सौ. रेखा म्हात्रे, सौ. सुरेखा इथापे उपस्थित राहणार आहेत.
स्पर्धेतील विजेत्या महिलांसाठी विविध आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली असून नगरसेविका सौ. सुजाता सुरज पाटील आणि नगरसेविका सौ. जयश्री एकनाथ ठाकूर या कार्यक्रमाच्या संयोजक आहेत. या कार्यक्रमामध्ये नेरूळ सेक्टर सहामधील, सारसोळे गावातील आणि कुकशेत गावातील महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन नगरसेविका सौ. सुजाता सुरज पाटील यांनी केले आहे.