नवी मुंबई : कुकशेतच्या मालमत्ता करप्रकरणी भाजपाच्या बेलापुरच्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी नुकतीच महापालिका आयुक्तांची भेट घेवून कुकशेतच्या ग्रामस्थांच्या समस्यांना महापालिका प्रशासनदरबारी वाचा ङ्गोडण्याचा प्रामाणिक प्रयास केला. तथापि कुकशेतच्या मालमत्ता कराचा प्रश्न आपणच लोकनेते गणेश नाईक हे पालकमंत्री असतानाच निकाली काढला असल्याचा दावा करत स्विकृत नगरसेवक सुरज पाटील यांनी थेट भाजपा आमदार सौ. मंदाताई म्हात्रेंनाच निशाणा साधला असल्याचे गेल्या दोन दिवसामध्ये स्पष्ट झाले आहे.
सुरज पाटील आणि कुकशेत हे समीकरण गेल्या काही वर्षामध्ये नवी मुंबईच्या राजकारणामध्ये अधोरेखित झाले. कुकशेतच्या मालमत्ता करप्रकरणी भाजपा आमदार सौ. मंदाताई म्हात्रे या महापालिका आयुक्तांना ग्रामस्थांसमवेत भेटावयास गेल्या असल्या तरी गेल्या आठ वर्षापासून सुरज पाटीलनामक कुकशेतचा एकांडा शिलेदार पायाला भिंगरी लावल्याप्रमाणे परिश्रम करत असल्याचे आणि महापालिका ते मंत्रालयादरम्यान हेलपाटे मारत असल्याचे महापालिका-मंत्रालय अधिकार्यांनी आणि नवी मुंबईकरांनी जवळून पाहिलेले आहे.
मुळातच भाजपा आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी ग्रामस्थांच्या आग्रहास्तव कुकशेत गावात येवून ग्रामस्थांची भेट घेतली. ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीप्रमाणे त्यांच्या समस्यांची तड लावण्याकरता त्यांनी महापालिका आयुक्तांची भेट घेवून अन्य गावांप्रमाणेच कुकशेत गावातील ग्रामस्थांनाही मालमत्ता कर आकारण्याची भूमिका सौ. मंदाताई म्हात्रे यांनी मांडली. महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांनीही त्यास सकारात्मक प्रतिसाद दिला. आमदार सौ. मंदाताई म्हात्रेंच्या ङ्गेसबुकवरून या बाबतची माहिती प्रसिध्द होताच त्यास नगरसेवक सुरज पाटील समर्थकांनी सुरज पाटील यांनी केलेल्या कार्याची कागदोपत्री माहिती सादर करत हे कार्य सुरज पाटील यांच्यामुळेच झाल्याचा दावा करणे सुरू झाले. यावरून काही काळ भाजपा व राष्ट्रवादीत राजकीय कलगीतुरा निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली. मुळात हे वादंग महापालिका प्रशासनामुळेच निर्माण झाल्याने महापालिका प्रशासनानेच याप्रकरणी वस्तुस्थितीसापेक्ष खुलासा करण्याची मागणी नवी मुंबईकरांकडुन करण्यात येवू लागली आहे.
सुरज पाटील हे महापालिकेच्या चौथ्या सभागृहात कुकशेत आणि नेरूळ सेक्टर १० मधील काही गृहनिर्माण सोसायट्यांचा मिळून बनलेल्या प्रभागाचे महापालिकेत नगरसेवक म्हणून प्रतिनिधीत्व करत होते. पाचव्या सभागृहातही ते स्विकृत नगरसेवक म्हणून कार्यरत आहेत. तथापि सुरज पाटील नगरसेवक होण्याअगोदरपासून राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे पदाधिकारी असताना कुकशेतच्या मालमत्ता करप्रकरणी मंत्रालय ते महापालिका हेलपाटे मारतच होते. परिश्रम करत होते.
कुकशेत हे पुर्नवसित गाव असून ते नेरूळ सेक्टर 14 या ठिकाणी वसविण्यात आले आहे. कुकशेत गावाची नोंद कागदोपत्री सेक्टर १२ असले तरी ते गावठाण आहे. स्थंलातरीत व पुर्नवसित गाव आहे. नवी मुंबईतील अन्य गावठाणाप्रमाणेच कुकशेत गावालाही मालमत्ता कर आकारण्यात यावा, शहरी भागातील कॉलनीच्या निकषावर मालमत्ता कर आकारण्यात येवू नये याबाबत गेली काही वर्षे सुरज पाटील महापालिका ते मंत्रालय टाहो ङ्गोडून कुकशेत गावाबाबतची वस्तूस्थिती निदर्शनास आणून देत होेते. कुकशेत गावावर प्रारंभापासूनच लोकनेते गणेश नाईकांनी पुत्रवत प्रेम केले आहे, ही बाब नाकारता येणार नाही. कुकशेत गावाच्या मालमत्ता करप्रकरणी सुरज पाटील यांच्या प्रामाणिक प्रयासाला व धावपळीला लोकनेते गणेश नाईकांनी सातत्यानेे सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे. वेळोवेळी मंत्रालयीन पातळीवरही बैठका आयोजित करून कुकशेतच्या मालमत्ता कर समस्येचे निवारण करण्याचे लोकनेते गणेश नाईक यांनी मंत्रालयीन पातळीवरूनही निर्देश दिले होते.
कुकशेत प्रभागातून २०१० साली निवडून आल्यावर सुरज पाटील यांनी कुकशेत गावच्या ग्रामस्थांचा मालमत्ता कर, स्थंलातरीत गावाला पुर्नवसनाच्या निकषावर सुविधांसाठी पाठपुरावा, गावच्या भुखंड हस्तांतरणासाठी एमआयडीसीकडे लावलेला तगादा, महापालिका प्रशासनाने कुकशेतच्या विकासाकरता निधी द्यावा याकरीता पालिका प्रशासनाशी केलेला संघर्ष चौथ्या सभागृहातील कामकाजादरम्यान नवी मुंबईकरांनी जवळून पाहिला आहे आणि सभागृहातील सर्वपक्षीय नगरसेवकांनी जवळून अनुभवलेलाही आहे. कुकशेतच्या मालमत्ता कराचा प्रश्न लवकरात लवकर निकाली न निघाल्यास कुकशेतच्या ग्रामस्थांसमवेत महापालिका मुख्यालयासमोर आमरण उपोषणही करण्याचा इशारा सुरज पाटील यांनी मधल्या काळात महापालिका प्रशासनाला दिला होता.
कुकशेतच्या ग्रामस्थांना मालमत्ताकरावरील दंडाचा वा थकबाकीचा निर्णय ङ्गेब्रुवारी २०१५ रोजीच महापालिका प्रशासनाने घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. नवी मुंबईतील अन्य गावांप्रमाणेच कुकशेत गावालाही मालमत्ता कर आकारण्याचे धोरण महापालिका प्रशासनाने २००९ सालीच स्पष्ट केले होते.
सध्या राज्यात भाजपा-शिवसेनेची सत्ता आहे. नगरविकास खाते मुख्यमंत्री ना. देवेंद्र ङ्गडणवीस यांच्या अखत्यारीत आहे. बेलापुर आमदार सौ. मंदाताई म्हात्रे या भाजपाच्या आहेत. भाजपा आमदार कुकशेतच्या समस्यांवर ज्यावेळी महापालिका आयुक्तांसमोर पोटतिडकीने आपली भूमिका मांडत होत्या, त्याचवेळी महापालिका प्रशासनाच्या अन्य अधिकार्यांनी वा खुद्द महापालिका आयुक्तांनी कुकशेतच्या मालमत्ता कराबाबत आजवर झालेल्या प्रशासकीय कामकाजाची माहिती आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांना देणे गरजेचे आहे. सौ. मंदाताई म्हात्रे या राजकारणातील मातब्बर असून बेलापुर मतदारसंघाचे ते विधानसभेत प्रतिनिधीत्व करत आहेत. आयुक्तांनी चर्चेत केवळ हो ला हो न मिळवता कुकशेतच्या मालमत्ता कराबाबतचा जे जे निर्णय ज्या ज्या वेळी घेण्यात आले आणि त्याकरता कोणी कोणी परिश्रम त्याची कागदोपत्री माहिती आमदार सौ. मंदाताई म्हात्रेंना सादर करणे आवश्यक होते. कुकशेतच्या मालमत्ता करप्रकरणी शासनाने लवकरात लवकर निर्णय घ्यावा, याकरता तिसर्या सभागृहातील तत्कालीन नगरसेविकेने महापालिका प्रशासनाकडे कागदोपत्री पाठपुरावा केल्याचे व प्रशासन दरबारी चर्चा घडवून आणल्याची माहिती नव्याने उघडकीस आली आहे.
कुकशेतच्या ग्रामस्थांना मालमत्ता कर अन्य गावठाणाप्रमाणेच आकारण्यात यावा याचा निर्णय महापालिका प्रशासनाने यापूर्वीच घेतल्याचे कागदोपत्री स्पष्ट झाले आहे. कुकशेतच्या मालमत्ता कराकरता व विकासाकरता सुरज पाटील यांनी केेलेले परिश्रम आणि त्यांचे योगदान कोणालाही नाकारता येणार नाही. आजही कुकशेतच्या ग्रामस्थांच्या घरोघरी जावून सुरज पाटील स्वत: मालमत्ता कराबाबत चौकशी करून, मालमत्ता कराचे देयक घेवून, आलेल्या देयकात सुधारणा करून महापालिका प्रशासनात स्वत: ग्रामस्थांचे धनादेश घेवून भरणा करत आहेत व भरणा केलेल्या रकमेची पावती ग्रामस्थांना घरी जावून देत आहेत. कुकशेतच्या मालमत्ता कराचा प्रश्न सुरज पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे आणि परिश्रमामुळे निकाली निघाला आहे. महापालिका प्रशासनाने आता स्वत:हून याप्रकरणी स्पष्टीकरण देणे काळाची गरज आहे. कुकशेतच्या मालमत्ता करावरून सोशल मिडीयावर राजकीय कार्यकर्त्यांमध्ये वादंग सुरू झाले आहे. अर्थाचा अनर्थ होण्यापूर्वी महापालिका प्रशासनाने अथवा आयुक्तांनी आपली ‘नरो वा कुंजरो’ची भूमिका सोडून वस्तूस्थिती जनतेसमोर सादर करणे गरजेचे आहे.