मुंबई : सोन्यापेक्षाही कांद्याला सध्या भलतीच मागणी आली आहे . त्यामुळेच की काय आता चक्क कांद्याचीच चोरी होऊ लागली आहे.
मुंबईतल्या प्रतिक्षानगर भागातून चक्क कांद्याची चोरी झाली आहे. तब्बल 700 किलो कांदा चोरण्यात आला आहे. त्या कांद्याच्या चौदा गोण्या होत्या. या प्रकरणी वडाळा ट्रक टर्मिनस पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल करण्यात आली आहे. आनंद नाईक नावाच्या व्यापार्यानं ही तक्रार दाखल केलीय.