श्रीनगर : भारतीय हवाई दलाचे मिग-२१ हे विमान सोमवारी सकाळी काश्मीरच्या बडगाम जिल्ह्यातील शेतात कोसळले. विमान कोसळत असताना वैमानिक सुरक्षितरित्या बाहेर पडल्याने बचावला.
नियमित सरावासाठी हवाई दलाच्या श्रीनगर तळावरुन या विमानाने उड्डाण केले होते. बडगाम जिल्ह्याच्या सोईबग भागात १०.५९ च्या सुमारास हे विमान कोसळले. या दुर्घटनेत जिवीतहानी झाली नाही अशी माहिती संरक्षण दलाचे प्रवक्ते कर्नल एस.डी.गोस्वामी यांनी दिली.
वैमानिक वेळेत बाहेर पडल्याने बचावला. लष्कराच्या हॅलिकॉप्टरमधून वैमानिकाला सुरक्षितस्थळी नेण्यात आले. अपघाताचे कारण शोधण्यासाठी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत अशी माहिती प्रवक्त्याने दिली.