*** गणेश पोखरकर ***
कल्याण : देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाईजी मोदी साहेबांच्या संकल्पनेतील विकासाची सूत्री असलेल्या सबका साथ – सबका विकास या धोरणाचा आधार कल्याण डोंबिवली महानगरक्षेत्राच्या समतोल आणि सर्वांगीण विकासासाठी घेण्यात येणार आहे. जनसामान्यांच्या सहकार्याने विकासाचे नियोजन करण्यासाठी कल्याण जिल्हा भाजपाच्या माध्यमातून जनतेचा जाहिरनामा बनवण्याचे काम करण्यात येणार आहे. समाजसेवक, विकासक, वास्तुविशारद, डॉक्टर, वकिल, कलाकार, विद्यार्थी, गृहिणी – नोकरदार महिला, आदी शेवटच्या व्यक्तीपर्यंत जाऊन, त्यांचे मातजाणून जनतेचा जाहिरनामा बनविण्यात येणार आहे. याच जाहिरनाम्याच्या माध्यमातून जनतेच्या विकासाचे स्वप्न साकारण्यासाठी भाजपा पक्ष आगामी कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकांना सामोरे जाईल अशी माहिती पत्रकार परिषदेच्या माध्यमातून भाजपा नेत्यांनी दिली. कल्याण भाजपा जिल्हा आयोजित पत्रकार परिषदेला भाजपा प्रदेश सचिव – जिल्हाध्यक्ष आमदार नरेंद्र आणि कल्याण डोंबिवली महापालिका उपमहापौर राहुल दामले यांनी संबोधित केले. यावेळी भाजपा पदाधिकारी राजाभाऊ पातकर, जमशेद खान, अनिरुद्ध जाधव, शिवाजी आव्हाड, दिपक ब्रीद आणि पंकज वीर सर आदी मान्यवर उपस्थित होते.
कल्याण – डोंबिवली शहराच्या विकासाचे धोरण ठरवताना शहरवासीयांना विश्वासात घेऊन त्याचे नियोजन केले पाहिजे असे ठाम मत आमदार नरेंद्र पवार यांनी यावेळी व्यक्त केले. यासाठी शहरातील नागरीकांनी आपल्या संकल्पनेतील शहर साकारण्यासाठी भाजपाला सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. येत्या 15 दिवसात कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील विभाग – प्रभाग कार्यकर्त्यांच्या मदतीने पिंजून काढून नागरीकांच्या मनातील विकासाच्या संकल्पनेची माहिती संकलीत करण्यात येईल. त्याचप्रमाणे कल्याण डोंबिवली महानगरतील समाजसेवक, विकासक, वास्तुविशारद, डॉक्टर, वकिल, कलाकार, विद्यार्थी, गृहिणी – नोकरदार महिला वर्गांशी चर्चासत्राच्या माध्यमातून चर्चा घडवून विकासाची दिशा ठरवण्यात येईल. यामध्ये तंत्रज्ञानाची मदत घेऊन नागरीकांच्या मुलाखती घेऊन माहिती संकलीत करण्याचा प्रयत्न असेल असे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान या संकलीत केलेल्या माहितीच्या आधारे कल्याण डोंबिवली महानगर क्षेत्राचा समतोल आणि सर्वांगीण विकास साधण्यासाठी जनतेच्या मनातील जनतेचा जाहिरनामा बनविण्यात येणार आहे. या अनोख्या जनतेच्या जाहिरनाम्याच्या मदतीने आगमी काळात कल्याण डोंबिवली महानगरक्षेत्राच्या विकासासाठी भाजपा कटीबद्ध असेल अभिवचन याप्रसंगी भाजपाच्या उपस्थित नेत्यांनी दिले. यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत जनतेसाठी काम करणार्या भाजपाच्या सबका साथ सबका विकास या धोरणावर जनता विश्वासाची मोहर उमटवेल असा आशावाद आमदार पवार यांनी व्यक्त केला.