नवी दिल्ली : स्मार्ट सिटी योजनेतर्ंगत विकसित करण्यात येणार्या ९८ शहरांची यादी केंद्र सरकारने गुरुवारी जाहीर केली. यात २४ राज्यांच्या राजधान्यांचा समावेश करण्यात आला आहे.
उत्तरप्रदेशातील सर्वाधिक १३, तामिळनाडूतील १२ आणि महाराष्ट्रातील १० शहरे स्मार्ट सिटी म्हणून विकसित करण्यात येणार आहेत.
मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण, ड़ोंबिवली, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, नागपूर आणि सोलापूर या महाराष्ट्रातील दहा शहरांचा स्मार्ट सिटीमध्ये समावेश करण्यात आला आहे.
मध्यप्रदेशातील सात, बिहार आणि आंध्रप्रदेशमधील प्रत्येकी तीन शहरांचा स्मार्ट सिटीमध्ये समावेश करण्यात आला आहे. पहिल्या वर्षी केंद्र सरकार स्मार्ट सिटीसाठी २४ शहरांची निवड करणार आहे.
केंद्रीय शहरी, नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू यांनी स्मार्ट सिटीची यादी जाहीर केली. शहरी जीवनातील गुणवत्ता वाढवणे हे स्मार्ट सिटी योजनेमागील मुख्य उद्दिष्टय आहे असे नायडू म्हणाले.
स्मार्ट सिटी मोहिम व्यवहार्य आणि वास्तववादी असून, यात लोकसहभाग आवश्यक आहे असे नायडू यांनी सांगितले. स्मार्ट सिटीची वैशिष्टय काय असतील त्याची माहितीही सरकारने दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या यांच्या या महत्वकांक्षी योजनेसाठी केंद्र आणि राज्य सरकार मिळून पुढच्या पाचवर्षात ९८ हजार कोटी रुपये खर्च करणार आहे.