कोल्हापूर : जिल्ह्यातल्या किणी टोलनाका कर्मचार्यांना, पैलवानांनी अक्षरशः बुकलून काढलं. सोबतच टोलनाक्याचीही तोडफोड केली.
पुणे-बंगळुरु महामार्गावरच्या किणी टोलनाक्यावरून पैलवान कोल्हापूरकडे जात होते. त्यांच्याकडे कर्मचार्यांनी टोल मागितला. मात्र आपण कुस्ती खेळायला गेलो असल्याचं सांगत, त्यांनी टोल द्यायला नकार दिला. त्यावरुन बाचाबाची झाली.
चिडलेल्या या पैलवानांनी शहरातून इतर पैलवानांना बोलावून घेतलं. त्यानंतर टोल कर्मचार्यांना बदडून काढलं. या प्रकरणी पेठवडगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून, मारहाण करणार्या पैलवानांचा शोध घेतला जात आहे.