मुंबई : दहिसर टोल नका त्वरित बंद करावा अशी मागणी करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आज सकाळी जोरदार आंदोलन करत रस्ता रोको केला. या वेळी टोलचा झोल त्वरित बंद करण्यासह स्थानिक नागरिकांकडून केली जाणारी बेकायदा टोल वसुली, परतीच्या टोल मध्ये सवलत न देणे, टोल घेण्यात नाक्यावर केला जाणारा विलंब, आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून न देणे आदी मुद्यांवरदेखील मनसे पदाधिकार्यांनी आक्रमक भूमिका घेतली.
मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी सर्व सामान्य नागरिकांची लूटमार व पिळवणूक करणार्या राज्यभरातील टोल च्या झोल विरुध्द आंदोलन छेडल्या नंतर तत्कालीन आघाडी व आताच्या युती शासनाचे धाबे दणाणले असून अनेक टोल नाके बंद करण्यात आले तर अनेक तोल नाक्यांवर लहान वाहनानांना टोल वसुली मधून वगळण्यात आले आहे . मनसेच्या आंदोलना नंतर धास्तावलेल्या भाजपा – शिवसेना युती शासनाने टोल मुक्त महाराष्ट्राचे दिलेले आश्वासन अध्याप पूर्ण केलेले नाही . जेणे करून मनसेचे टोल विरुध्द आंदोलन सुरूच आहे.
आज शुक्रवार दि . ११ सप्टेंबर रोजी सकाळी मनसेचे सरचिटणीस संजय घाडी, उपाध्यक्ष अरुण कदम , अवधूत चव्हाण, वाहतूक सेनेचे जिल्हा संघटक सुलतान पटेल , मीरा भाईंदर शहर अध्यक्ष प्रसाद सुर्वे , विध्यार्थी सेनेचे एड . दीपक शर्मा सह मोठ्या संखेयेने मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी दहिसर टोलनाका बंद करण्यासाठी रस्ता रोको आंदोलन केले . या वेळी मनसैनिकांनी भाजपा युती शासना विरुद्ध घोषणा दिल्या .
मनसेच्या शिष्टमंडळाला शासनाच्या रस्ते विकास महामंडळाचे अभियंता गायकवाड यांनीकडक पोलिस बंदोबस्तात सामोरे जात मनसेच्या जनहिताच्या मागण्या ऐकून घेतल्या. गेल्या अनेक वर्षांन पासून सुरु असलेल्या या टोल नाक्यावर अब्जावधी रुपयांची वसुली झाली असून हा टोल तत्काळ बंद करा. शासनाच्या टोल धोरणाप्रमाणे ५ कि.मी परिसरात राहणार्या स्थानिक नागरीकांना टोलमधून सवलत असताना ठेकेदार कंपनीने नागरिकांची लूटमार चालवली आहे. त्वरित स्थानिक नागरीकांना टोल मधून सवलत द्यावी. ठेकेदाराने ५० टक्के सवलत रिटर्न टोल ची पावती फाडणार्यास देणे बंधनकारक असताना ठेकेदार मात्र रिटर्नचा टोल पावती देत नाही. त्वरित रिटर्नचा टोल सवलतीच्या दरात सुरू करा. तसे फलक ठेकेदाराने न लावल्यास मनसे लावेल. रुग्णवाहिका, शौचालय आदी विविध सोयी सुविधा देखील ठेकेदाराने केलेल्या नसून एकंदर ठेकेदाराने सर्वसामान्य नागरिकांची लूटमार करून नियम – अटीशर्थीचे उल्लंघन केल्याने टोल वसुली तत्काळ बंद करावी, ठेकेदारास काळ्या यादीत टाकावे जेणे करून नागरिकांना दिलासा मिळून या ठिकाणी होणारी वाहतूक कोंडी देखील कायमची दूर होईल.
येत्या १० दिवसात शासनाकडून कार्यवाहीचे लेखी उत्तर देण्याचे आश्वासन महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचे अभियंता गायकवाड यांनी पोलिस अधिकार्यांन समक्ष मनसे पदाधिकार्यांना दिले. आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , पालकमंत्री एकनाथ शिंदे व सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांना देखील निवेदने दिली असून शासन याची गंभीर दखल घेऊन कारवाई करेल अशी आशा उपाध्यक्ष अरुण कदम यांनी व्यक्त केली आहे. अन्यथा जनते च्या हिता साठी या पुढचे आंदोलन आणखी तीव्र असेल असा इशारा सरचिटणीस संजय घाडी यांनी दिला आहे.