नवी मुंबई : लोकनेते गणेश नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी कॉंग्रेस प्रभाग ९६ व ९७च्या वतीने तीन दिवसीय आधार कार्ड व पॅन कार्ड शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेरूळ तालुकाध्यक्ष गणेश भगत यांनी दिली.
लोकनेते गणेश नाईक यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून १३ सप्टेंबर ते १५ सप्टेंबर या कालावधीत या शिबिराचे आयोजन करण्यात आले असून सकाळी १० ते सांयकाळी ६ या वेळेत हे शिबिर राबविण्यात येणार आहे. नेरूळ सेक्टर १६ येथील धर्मवीर संभाजी राजे उद्यानालगतच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जनसंपर्क कार्यालयात या शिबिराचे आयोजन करण्यात आले असुन नेरूळवासियांनी मोठ्या संख्येने या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन तालुकाध्यक्ष गणेश भगत व स्थानिक नगरसेविका सौ. रूपाली किसमत भगत यांनी संयुक्तपणे केले आहे.