नवी मुंबई : शिवसेनेचे माजी नगरसेवक रतन मांडवे आणि प्रभाग 87च्या नगरसेविका सौ. सुनिता रतन मांडवे यांच्या विवाहाचा रौप्यमहोत्सवी वाढदिवस (दि. 13 सप्टेंबर) रात्रीच्या 12च्या ठोक्यालाच उत्साहात साजरा करण्यात आला.
मांडवे दांपत्य हे नेरूळ पश्चिमेला परिचित असा परिवार आहे. रतन मांडवे हे शिवसेनेत कार्यरत असून सर्वपक्षीय राजकीय नेतेमंडळींशी त्यांचे सलोख्याचे संबंध आहेत. रात्री 12 च्या ठोक्यालाच रतन मांडवेंच्या निवासस्थानी जमलेल्या राजकीय, सामाजिक व अन्य क्षेत्रातील मंडळींनी विवाहाच्या वाढदिवसाचा रौप्यमहोत्सवी जल्लोष साजरा करण्यास सुरूवात केली.
रतन मांडवे आणि सुनिता मांडवे यांनी केक कापून विवाहाचा रौप्यमहोत्सवी वाढदिवस साजरा केेला. यावेळी मांडवे परिवाराच्या मित्र परिवारातील पत्रकार व नवी मुंबई लाईव्ह.कॉमचे संपादक संदीप खांडगेपाटील, कोलवाणी माता मित्र मंडळाचे अध्यक्ष मनोज यशवंत मेहेर, युवा सेनेचे स्थानिक शाखाध्यक्ष विशाल गुंजाळ, नवी मुंबई देशस्थ, आगरी-कोळी सामाजिक संस्थेचे कार्याध्यक्ष सुजित शिंदे, संतोष (भाऊ) पिंंगळे, नितीन शिंदे, हेमंत पोमण, मकरंद वैती, अर्जुन (भाऊ) मढवी, निखील मांडवे, नैनेश मांडवे, अतुल ठाकूर, अमोल सणस, अमोल नवघणे, हेमंत मेहेर यांच्यासह अनेक जण यावेळी उपस्थित होते.