सुजित शिंदे : ७७१८०३६००७
नवी मुंबई : तुर्भेतील माता बाल रूग्णालय बंद झाल्याने उपचारासाठी सभोवतालच्या पाचही प्रभागातील नागरिकांना अतोनात त्रास सहन करावा लागत आहे. पाच जणांचा मृत्यू झाला आहे. साथीचे आजार आटोक्यात आणण्यासाठी धुरीकरणाची मोहीम राबविल्यास गटारातील मच्छर तर मरत नाहीत, पण गटारातील झुरळे घरामध्ये येतात. त्यामुळे नागरिकांच्या असंतोषाचा सामना नगरसेवकांना सहन करावा लागत असल्याची कैफीयत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रभाग ७३च्या नगरसेविका राधा कुलकर्णी यांनी महासभेत मांडली.
आरोग्यविषयक प्रश्नावर चर्चा करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या खास महासभेदरम्यान नगरसेविका राधा कुलकर्णीसभागृहात बोलत होत्या.
धुरीकरण करत असताना रॉकेलचा वास येतो, धुरीकरण करणारे मच्छर मारण्यासाठी औषध मारतात की धुर करण्यासाठी रॉकेल वापरतात अशी विचारणा नगरसेविका राधा कुलकर्णी यांनी केली.
धुरीकरण मच्छर मारण्यासाठी आपण करतो, त्यासाठी लाखो रूपये खर्च करतो. परंतु या धुरीकरणामुळे मच्छर तर मरतच नाही, पण झुरळे मात्र गटारातून बाहेर येवून घरामध्ये पसरतात. त्यामुळे धुरीकरण मच्छरला मारण्यासाठी की झुरळांना घरात आणण्यासाठी करतात याची विचारणा लोकांकडून आम्हाला होते. याचा प्रशासनाने खुलासा करण्याची मागणी नगरसेविका राधा कुलकर्णी यांनी सभागृहात केली.