मुंबई : व्हॉट्सअपने आयफोन यूझर्ससाठी एक नवीन सुविधा उपलब्ध करून दिलीय. ‘स्टोरेज युसेज’ या सुविधेच्या माध्यमातून आता तुम्ही कोणत्या व्यक्तीशी बोलण्यासाठी किती डेटा वापरला याची संपूर्ण माहिती आयफोन यूझर्सना मिळू शकणार आहे.
‘द इंडिपेंडन्ट’नं दिलेल्या माहितीनुसार, व्हॉट्सअप ऍप्लिकेशनमध्ये ‘स्टोरेज युसेज’ हे एक नवीन फिचर जोडण्यात आलंय. यामुळे, आता आयफोन यूझर्स आपले संपर्क आणि ग्रुप्सची रँकिंगही करू शकणार आहेत. ही रँकिंग पाठवलेल्या किंवा प्राप्त केलेल्या संदेशाच्या आधारावर होईल.
या फिचरचं वैशिष्ट्य म्हणजे, यामुळे आपल्याला आपण व्हॉटसअपवर आपण कोणत्या व्यक्तीसोबत बोलण्यासाठी किती डाटा वापरतो, याचीही माहिती आपल्याला मिळू शकेल. त्यामुळे, फोन मेमरीचा वापर योग्य पद्धतीनं तुम्हाला करता येऊ शकेल. तसंच तुमचा खास मित्र कोणता आहे, ज्याच्याशी तुम्ही तासनतास गप्पा मारता हेदेखील लगेचच समजू शकेल.
हे फिचर व्हॉटसअपच्या २.१२.२५० या व्हर्जनवर उपलब्ध होणार आहे. यामध्ये काही नवीन ‘इमोजी’चाही समावेश करण्यात आला आहे. तसंच कस्टम नोटीफिकेशनचाही पर्याय यात उपलब्ध आहे. त्यामुळे तुम्ही एकदा ‘रिड’ केलेला मॅसेज पुन्हा ‘अनरिड’ही करू शकाल. तसंच स्वतंत्र चॅटच्या नोटिफिकेशन लाईटचा रंग आणि कॉलर रिंगटोनही निवडू शकता.
सुरुवातील आयफोनसाठी उपलब्ध करून देण्यात आलेलं हे फिचर लवकरच सर्व व्हॉटसअप यूझर्ससाठी उपलब्ध होणार आहे.