वुहान : दुहेरीतील भारताची अव्वल महिला टेनिसपटू सानिया मिर्झा आणि मार्टिना हिंगीस सध्या भन्नाट फॉर्ममध्ये आहे.
शनिवारी वुहान ओपन टेनिस स्पर्धेच्या महिला दुहेरीच्या अंतिम फेरीत सानिया-मार्टिना जोडीने रोमानियन जोडी इरिना कॅमेलिया आणि मोनिका निकुलेस्कूवर सरळ सेटमध्ये विजय मिळवून स्पर्धेचे जेतेपद पटकावले.
सानिया-मार्टिना जोडीने कॅमेलिया-निकुलेस्कूला डोकेवर काढण्याची संधी न देता संपूर्ण सामन्यावर वर्चस्व गाजवले. सानिया-मार्टिना जोडीने दोन्ही सेट ६-२, ६-३ असे जिंकले.
सानिया-मार्टिना जोडीचे वर्षातही हे सातवे जेतेपद आहे. यंदाच्या वर्षी विम्बल्डन आणि अमेरिकन ओपन स्पर्धेत महिला दुहेरीचे जेतेपद याच जोडीने पटकावले आहे.