नवी दिल्ली : परदेशात जमा करण्यात आलेला बेहिशेबी पैशाविरोधात करण्यात आलेल्या नव्या कायद्यानुसार सरकारने देण्यात आलेल्या 90 दिवसांच्या कालावधी अनेकांनी आपले काळा पैसा जाहीर केला आहे. कर अधिकार्याकडे एकूण 4147 कोटी रूपयांची माहिती दिली आहे. यापूर्वी ही रक्कम 3770 कोटी रूपये होती.
महसूल सचिव हसमुख अधिया यांनी आज पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार गेल्या आठवड्याच्या अखेरीस एकूण 638 प्रकरणाची माहिती मिळाली. त्यानुसार परदेशात 4147 कोटी रुपयांच्या बेकायदा संपत्तीची घोषणा करण्यात आली. ही अवधी 30 सप्टेंबरपर्यंत होती. सरकारला या सर्वांकडून कर आणि दंड म्हणून एकूण 2488.20 कोटी रुपये मिळणार आहे.
यापूर्वी सरकारने एक ऑक्टोबर रोजी घोषणा केली होती की अनुपालन सुविधेतंर्गत 3770 कोटी रूपयांचा काळा पैसा जाहीर करण्यात आला होता. ही प्राथमिक माहिती होती. आता एकूण आकडा 4147 कोटी रुपये आहे.