हरेश साठे /पनवेल
डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान तर्फे पालेबुद्रुक -फणसवाडी येथे राबविण्यात आलेल्या वृक्ष लागवड तथा संवर्धन अभियानास तहसिलदार दीपक आकडे यांनी सदिच्छा भेट देत अभियानास प्रशासनाच्या वतीनं सहकार्य करण्याचं आश्वासन दिले.
डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान तर्फे संपूर्ण महाराष्ट्रभर वृक्ष लागवड तथा संवर्धन अभियान राबविण्यात आलं आहे. या अभियाना अंतर्गत पनवेल तालुक्यातील पालेबुद्रुक – फणसवाडी येथे सुमारे पाच हजारांहून अधिक विविध जातीच्या वृक्षांची लागवड करण्यात आहे. रविवारी पनवेलचे तहसिलदार दीपक आकडे तसेच मुंबई शहराचे नायब तहसिलदार राजेंद्र नाईक यांनी या अभियानास सदिच्छा भेट देत पहाणी केली.यावेळी प्रशासनाच्या वतीनं सहकार्य करण्याचं आश्वासन तहसिलदार दीपक आकडे यांनी दिले.