मुंबई : कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी काँग्रेसने केली आहे. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे- पाटील यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे ही मागणी केली आहे.
कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने आयोजित केलेल्या विकास परिषदेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी साडेसहा हजार कोटी रुपयांच्या कामांचा विकास आराखडा जाहीर केला. ही शहरे स्मार्ट सिटी करून त्यांचा कायापालट केला जाईल, अशी घोषणाही त्यांनी केली.
त्यामुळे राज्याच्या तिजोरीतून निधी देऊन असा पॅकेज जाहीर करणे, हे भाजपाला निवडणुकीत लाभ मिळविण्यासाठी आहे. मुख्यमंत्र्यांचे हे वक्तव्य निवडणूक आचारसंहितेचा भंग असल्याचा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केला आहे.
हा निवडणूक आचारसंहितेचा भंग असल्याचे विरोधी पक्षनेते विखे-पाटील यांनी सांगितले. तसेच याबाबतही त्यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे.