महागाई विरोधात मनसे रस्त्यावर
गजाननस्त्रांचा रस्त्यांवर पुन्हा वावर
नवी मुंबई : गेल्या वर्षभरात राज्य व केंद्रात सत्ता परिवर्तन होऊनही जाहिराती, पर्यटन वीजबिल, हॉटेल मध्ये खाणे, कुरियर, विमा पॉलिसी, घर खरेदी व्यवहार इ. सेवा मोठ्या प्रमाणात महागल्या आहेत.यावर कहर म्हणून कि काय ऐन सणासुदीच्या दिवसात तूरडाळीचा भाव 235 रुपये प्रती किलो म्हणजेच गगनाला भिडला आहे.
याचा निषेध म्हणून आज सर्वसामान्यांचे ताट रिकामे करणार्या भाजप-सेना सरकारच्या विरोधात नवी मुंबई मनसे मध्यवर्ती कार्यालय ते नवी मुंबईतील वाशी ए.पी.एम.सी च्या प्रवेशद्वारावर मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढून थाळीनाद आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
या आंदोलनात शहर अध्यक्ष गजानन काळे, उपशहर अध्यक्ष निलेश बाणखेले, विनोद पार्टे, सचिव संदीप गलुगडे , अॅड.कौस्तुभ मोरे, रवींद्र वालावलकर, तसेच महिला सेनेच्या डॉ.आरती धुमाळ, अनिता नायडू, शुभांगी बंदिछोडे विद्यार्थी सेनेचे सविनय म्हात्रे, निखील गावडे, रोजगार विभागाचे आप्पा कोठुळे, सनप्रीत तुर्मेकर, तुषार कचरे तसेच विनय कांबळे, मंदार मोरे, अभिलेश दंडवते, विलास चव्हाण, अभिजित देसाई, जितेश कायस्थ, प्रेम जाधव, प्रवीण वाघमारे, विठ्ठल गावडे, रुपेश कदम, बाळा पाटील, बाबाजी गोडसे, सागर नाईकरे, अनिकेत भोपी, देव प्रसाद, हृषीकेश तिडके, नितीन नाईक, विलास घोणे, गौरव महाडिक, नितीन तळेकर, सचिन कदम, नितीन खानविलकर, अशोक कांबळे, भरत मावळे, सुधाकर गवळी, चेतन कासार, नितीन तळेकर, अरुण पवार, अमोल इंगोले, अशोक भोसले, वैभव बारवे, शिवाजी नांदुरकर, विनायक पिंगळे, भूषण बारवे, समाधान चव्हाण यांचा सहभाग होता.