ठाणे : मीरा भाईंदर हद्दीमधील उत्तन चौक, मनोरी या मार्गावरील महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची खंडित झालेली बस सेवा पुन्हा सुरु करण्यात खासदार राजन विचारे यांना यश आले असून बसचे उदघाटन मीरा-भाईंदर शिवसेना सहसंपर्क प्रमुख आमदार प्रताप सरनाईक यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी उपजिल्हाप्रमुख प्रभाकर म्हात्रे, शहरप्रमुख प्रशांत पालांडे, धनेश पाटील, संदीप पाटील, माजी शहरप्रमुख मनोज मयेकर, महिला शहरप्रमुख स्नेहल कल्सारीया, सुप्रींया घोसाळकर, नगरसेविका जयमाला पाटील, शुभांगी कोटियन, मंदाकिनी गावंड, उपशहरप्रमुख शंकर वीरकर, केसरीनाथ पाटील, विभागप्रमुख अशोक मोरे, मॅकसी नेटोघर, डिक्सन दिनेकर, अलिएस बंड्या, उत्तन प्रवासी संघटनेचे ऑल्वीस फॅरो आणि सर्व कार्यकर्ते तसेच उत्तनवासीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुर्धा, राई, मोर्वा, डोंगरी, तारोडी, केशवसृष्टी, उत्तन, करईपाडा, पाली, चौक गोराई, कुळव आणि मनोरी ही 25 हजाराहून जास्त लोकसंख्या असलेली गावे भाईदर रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेस 15 ते 20 किमी परिसरात विखुरलेली असून येथे प्रवास करणारे मुख्य प्रवासी म्हणजे विद्यार्थी, शिक्षक, कामगार तसेच उत्तन, गोराई, मनोरी बीचला भेट देणारे पर्यटक आणि एस्सल वर्ल्ड आणि जगप्रसिद्ध पॅगोडाला भेट देणारे पर्यटक असतात. पूर्वी या सर्व गावांना राज्य परिवहन महामंडळाची अतिशय नियमित आणि उत्तम प्रकारची सेवा उपलब्ध होती. सर्व प्रवासीवर्ग राज्य परिवहन सेवेच्या सेवेने खुश होता. कालांतराने मीरा-भाईदर महानगरपालिकेची स्थापना झाली आणि पालिकेची परिवहन सेवा सुरु झाल्याने राज्य परिवहन मंडळाची सेवा बंद करण्यात आली. परतू मीरा-भाईंदर महानगरपालिका लोकांना बसेसचा अपुरा पुरवठा असल्याने बस सेवा देण्यास अपयशी ठरली. यासाठी खासदार राजन विचारे यांनी या समस्येची दखल घेवून राज्य परिवहन सेवेला पुन्हा ही महाराष्ट्र राज्य परिवहन बस सेवा सुरु करण्यास भाग पाडले. या बसेस दिवसभरात भाईंदर ते उत्तन चौक अशा 12 फेर्या असून पुढे प्रवाशांच्या संख्येत वाढ झाल्यास फेर्या वाढविण्यात येईल, असे ठाणे आगार व्यवस्थापक मोरे यांनी कळविले आहे.
खासदार राजन विचारे यांनी मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या आयुक्तांबरोबर चर्चा करून त्यांनाही महानगरपालिकेची परिवहन सेवा सुधारण्याची विनंती केली असता त्यांनीही याबाबत सकारात्मक भूमिका घेवून लवकरच परिवहन सेवेत केंद्र शासनाच्या मदतीने नवीन बसेस दाखल करण्याचे आश्वासन दिले