ठाणे : खासदार राजन विचारे यांच्या लोक मतदार संघातील भाईंदर पश्चिम भागातील उत्तन किनार पट्टीवर मच्छीमारासाठी पुढाकार घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी उत्तन किनारपट्टीतील मच्छीमार व महाराष्ट्र मेरी टाईम बोर्डचे कॅप्टन दिवाकर प्रसाद प्रादेशिक बंदर अधिकारी सिजे लेपांडे तसेच महाराष्ट्र मत्स्य व्यवसाय मुंबई याचे प्रादेशिक उपायुक्त डॉ सुनील देशपांडे, सहआयुक्त रविंद्र वायडा अधिकार्याची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठीकीला मीरा-भाईंदर शिवसेना सहसंपर्क प्रमुख आमदार प्रताप सरनाईक, उपजिल्हाप्रमुख प्रभाकर म्हात्रे ,शहरप्रमुख प्रशांत पालांडे ,धनेश पाटील, संदीप पाटील, माजी शहरप्रमुख मनोज मयेकर, महिला शहरप्रमुख स्नेहल कल्सारीया, सुप्रींया घोसाळकर, नगरसेविका जयमाला पाटील, शुभांगी कोटियन, मंदाकिनी गावंड, उपशहर प्रमुख शंकर वीरकर, केसरीनाथ पाटील, विभागप्रमुख अशोक मोरे, मॅकसी नेतोघर, डिक्सन दिनेकर, अलिएस बंड्या, उत्तन प्रवासी संघटनेचे ऑल्वीस फॅरो तसेच उत्तनवासीय मछीमार मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकीत उत्तन परिसरातील सुमारे 25 किलोमीटरचा समुद्रकिनारा असलेल्या या परिसरात मनोरी, गोराई, उत्तन चौक, तारोडी, डोंगरी ही गावे असून लोकांचा मच्छिमारी हा एकमेव व्यवसाय असून त्यांच्या बोटी लावण्यासाठी किनार्यावर कुठेही जेट्टी नाही. त्यामुळे किनार्यावर बोटी आदळून आपटून त्यांचे अपरिमित नुकसान होते. तसेच त्या किनार्यावर रिपेरिंग करता येत नाही. बोटी रिपेअर करण्यासाठी खूप लांबवर न्याव्या लागतात, त्यामध्ये खूप वेळ आणि पैसा जातो आणि आर्थिक नुकसान होते. तसेच बर्फ ,डीझेल, पाणी बोटीत टाकण्यासाठी खूपच त्रास होतो. मच्छी उतरवण्यासाठीदेखील खूप गैरसोय होते. अशा अनेक समस्या वर चर्चा करण्यात आली. त्यावर खासदार विचारे यांनी जेटी बांधण्याच्या कामाला लवकरात लवकर सुरुवात करा. जर निधी अपुरा पडत असेल तर खासदार निधी वापरा अशा सूचना महाराष्ट्र मत्स्य व्यवसाय मुंबई याचे प्रादेशिक उपायुक्त डॉ. सुनील देशपांडे यांना देण्यात आल्या. त्याच बरोबर या समुद्रकिनार्यावर संपूर्ण खडकाळ भाग असून या खडकाळ भागातून मधोमध बोटीना किनारी येण्यासाठी अरुंद रस्ता असल्याने .तो बोटीना रस्ता दाखवण्यासाठी दोन सिग्नल लाईट लावलेल्या आहेत परंतु त्या गेल्या 1 वर्षापासून पासून बंद पडलेल्या आहेत .त्यामुळे बोटीना समुद्रात आणि किनार्यावर ये- जा करीत असताना कुठल्याही क्षणी खडकावर आदळून जीवितहानी होण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे. यावर खासदार विचारे यांनी महाराष्ट्र मेरी टाईम बोर्डच्या ढिसूळ कारभाराबाबत अतिशय नाराजी दर्शवली. त्यावर त्यांनी जर काम होत नसेल तर राजीनामे अशी स्पष्ट भाषेत सूचना दिल्या. त्यावर त्यांनी येत्या 22 तारखेला जागेवर जाऊन आम्ही सर्वे करून प्रस्ताव तयार करून तो प्रस्ताव मजुरीसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी मेरी टाईम बोर्ड महाराष्ट्र राज्य यांच्याकडे मंजुरीसाठी सादर करू असे आश्वासन खा .विचारे यांना देण्यात आले. या झालेल्या बैठकीमुळे उत्तन वासियातील मछीमारांमध्ये दिलासा मिळाला आहे.