नवी मुंबई : महापालिका प्रशासनात काम करणार्या मूषक नियत्रंण विभागाच्या कामगारांचे वेतन गेल्या काही महिन्यांपासून वेतन वेळेवर दिले जात नसल्याने संबंधित कामगारांना व त्यांच्या परिवारांना सतत आर्थिक संकटांचा सामना करावा लागत असल्याने या कामगारांचे वेतन वेळेवर देण्याची मागणी सिडकोचे माजी संचालक व शिवसेना नगरसेवक नामदेव भगत यांनी महापालिका आयुक्तांकडे एका लेखी निवेेदनातून केली आहे.
महापालिका आयुक्तांना दिलेल्या लेखी निवेदनात नामदेव भगत पुढे म्हणालेे की, महापालिका प्रशासनामध्ये मूषक नियत्रंण कामगार गेल्या काही वर्षापासून ठेकेदारांच्या माध्यमांतून कंत्राटी तत्वावर काम करत आहेत. या कामगारांना दिवसाउजेडी तसेच रात्री-अपरात्रीहीदेखील मूषक नियत्रंणाचे काम करावे लागत आहे. गेली अनेक वर्षे या मूषक नियत्रंणच्या कामगारांनी अवघ्या 5 हजार रूपये वेतनावर काम केलेले आहे. अडीच वर्षापूर्वीच त्यांच्या वेतनात वाढ होवून त्यांना सफाई कामगारांच्या बरोबरीने वेतन दिले जात आहे. या कामगारांच्या हातात रात्रीच्या वेळी मूषक मारण्यासाठी फक्त वीजेरी (बॅटरी/टॉर्च) आणि हातात काठी हेच अनेकदा पहावयास मिळत आहे. मूषक मारण्यासाठी गोळ्या टाकण्यासाठी ग्लोव्हज नाहीत, काठी व वीजेरीही बर्याचवेळा कामगारांना आपलीच आणावी लागते. रात्री-अपरात्री मूषक नियत्रंंणच्या कामगारांना भटक्या व मोकाट कुत्र्यांचाही ससेमिरा चुकवावा लागत आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये मूषक नियत्रंणचे कामगार काम करत आहेत. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे या मूषक नियत्रंणच्या कामगारांना आजतागायत कधीही वेळेवर वेतन मिळालेले नाही. आजही या कामगारांना ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचे वेतन मिळालेले नाही. ऑक्टोबर महिन्याची आज 20 तारीख आहे. दसरा दोन दिवसावर आलेला आहे. वाढती महागाई आणि विलंबाने होणारे वेतन यामुळे समस्येचे गांभीर्य लक्षात घेवून मूषक नियत्रंणच्या कामगारांचे वेतन त्वरीत देण्याचे निर्देश संबंधित विभागाला द्यावेत अशी मागणी नगरसेवक नामदेव भगत यांनी केली आहे.