मुंबई : वांद्रे येथील कलानगर भागात गेल्या तीन तासांपासून जलवाहिनी फुटली असून लाखो लीटर पाणी वाया गेले आहे.
मुंबई महापालिका याकडे लक्ष देणार आहे का असा प्रश्न विचार उपस्थित केला आहे. मुंबईत गेल्या काही दिवसापासून पाणीकपात केली जात आहे. अशा प्रकारे पाणी वाहून गेल्याने मुंबईकरांना आणखी पाणी कपातीला सामोरे जावे लागण्याची शक्यता दिसते आहे.