मुंबई : इंडोनेशियातील बाली येथे अटक केलेल्या गँगस्टर छोटा राजनला मुंबईतच आणणार असल्याचे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.
राजनला ऑर्थर रोड कारागृहात अंडा सेलमध्ये ठेवले जाण्याची दाट शक्यता त्यांनी व्यक्त केली. मात्र छोटा राजनला थेट मुंबईत आणणार की त्याला दिल्लीहून मुंबईला आणले जाणार, याविषयी आपणांस माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले.
प्रत्यार्पणासंदर्भातील औपचारिकता आज रात्रीपर्यंत पूर्ण होतील, अशी माहिती इंटरपोल अधिकार्यांनी दिली आहे. त्यामुळे आज रात्रीच छोटा राजनला भारतात आणले जाण्याची दाट शक्यता आहे.
या अंडा सेलमध्ये यापूर्वी दहशतवादी अजमल कसाब याला ठेवण्यात आले होते.