नवी दिल्ली : विमानाच्या इंधनदरात कपात करण्यात आली असून विनाअनुदानित गॅस सिलिंडरच्या दरात २७.५० रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील बदललेल्या दरामुळे ऑइल कंपन्यांनी हा निर्णय घेतला.
इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, हिंदुस्थान पेट्रोलियम आणि भारत पेट्रोलियम या तीन प्रमुख रिटेल कंपन्यांनी विमान इंधन आणि एलपीजी गॅसच्या दराचा आढावा घेतला. त्यानुसार दरात बदल करण्यात आले. दिल्लीत विमानाच्या इंधनदरात १४२.५६ प्रति किलोलिटर किंवा ०.३ टक्क्यांनी कपात करण्यात आली आहे. या दरात स्थानिक कर वेगळे लागू असतील. त्याचबरोबर विनाअनुदानित गॅसच्या दरात सुमारे २७.५० रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. नवीन दरवाढीमुळे दिल्लीत विनाअनुदानित गॅसची किंमत ५४५ रुपये इतकी झाली आहे. एक ऑक्टोबरला विनाअनुदानित गॅसच्या दरात ४२ रुपयांनी कपात करण्यात आली होती. त्यापूर्वी सप्टेंबर, ऑगस्टमध्ये दर घसरले होते. जुलैमध्ये या गॅसचा दर ६०८.५० रुपये इतका होता. सध्या दिल्लीत अनुदानित गॅसची किंमत ४१७.८२ रुपये आहे.