नवी मुंबई : कोकणवासीयांसाठी महत्वाची असणार्या कोकण रेल्वेचे दुपदरीकरण आणि विद्युतीकरण लवकरच होतय. येत्या ८ नोव्हेंबरपासून या दुपदरीकरणाच्या कामाला सुरुवात केली जाणार आहे.
कोकण रेल्वेच्या एकूण ७४१ किलो मीटर लांब मार्गाच हे दुपदरीकरण होणार असून यासाठी साधारणता १० हजार कोटी रुपये तर विद्युतीकरणासाठी १५ हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. पुढील पाच वर्षांत हे काम पूर्ण करण्याचा मानस कोकण रेल्वेचा आहे. दुपदरीकरणानंतर या मार्गावर १५ नविन रेल्वे स्टेशन उभारण्यात येणार आहे.
याचबरोबर चालू वर्षात कोकण रेल्वेचे विस्तारीकरण होणार असून चिपळूण ते सातारा आणि वैभववाडी ते कोल्हापूर हे भाग देखील कोकण रेल्वेने जोडले जाणार आहेत. यातील चिपळूण ते सातारा या ११० किलोमीटर च्या रेल्वेमार्गासाठी साधारणता ३ हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
वैभववाडी-कोल्हापूर या प्रकल्पासाठी ही ३ हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित असून हे दोन्ही प्रकल्प पब्लिक-प्रायव्हेट पार्टनरशीपच्या माध्यमातून पूर्ण केले जाणार आहेत. कोकण रेल्वेच्या या नविन प्रकल्पामुळे कोकण रेल्वेचा विस्तार आता कोकणाच्या बाहेर होण्यास मदत होणार आहे.
कोकण रेल्वेला मागील वर्षात ४० कोटींचा निव्वळ नका झाला आहे. याचा वापर कोकण रेल्वे पेसेंजर फॅसिलिटी आणि स्टेशन आधुनिकीकरणासाठी करणार आहे. पेसेंजर साठी ई टिकीटींग, स्वच्छ पाणी, ऐटीएम, रेल्वे स्थानकांवर सीसीटीव्ही बसविल्या जाणार आहे.
त्याबरोबर दुपदरीकरणानंतर या मार्गावर १५ नविन रेल्वे स्टेशन उभारण्याचा कोकण रेल्वेचा मानस आहे. यांतील ६ स्थानकं येत्या वर्षभरात उभारली जाणार आहेत. याचबरोबर पोर्ट कन्केक्टीव्हीटी आणि व्हेअरहाऊस उभारून कोकण रेल्वेचा इंन्कप वाढविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
दरम्यान, नवी मुंबईतील कोकण रेल्वेचे मुख्य कार्यालय गोवा या ठिकाणी संपूर्णपणे स्थालांतरीत केले जाणार नसले तरी ऑपरेशन डिपार्टमेंट मात्र गोवा येथे जाणार असल्याचे तायल यांनी स्पष्ट केले आहे.