मुंबई : धावत्या एक्सप्रेस ट्रेन मधे ७१ लाख ५६ हजार किमतीचे सोन्याचे दागिने लुटणार्या ५ लोकांना मुंबई रेलवे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे.
अटक आरोपीमधे एका नेव्ही मध्ये सर्विस करत असलेल्या व्यक्तीचा समावेश आहे. अटक आरोपी वेगवेगळ्या राज्यातून अटक झाले आहेत.. तर पोलिस त्यांच्या पर्यन्त पोचू नये म्हणून या आरोपीने दुसर्या व्यक्तीच्या नावने सीबीआईच बनावट आय कार्ड बनवून घटनास्थळावर फेकून दिले होते.
रेलवे पोलिसांच्या ताब्यात असलेले या आरोपींचे नाव जेम्स अल्मेडा, जगदीश दया, नविन मालिक, पंकज सिंह आणि प्रदीप कुर्डेकर आहे. या पाचही आरोपीना पोलिसांनी कोकण कन्या मेल एक्सप्रेसमधे ७१ लाख ५६ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लुटाण्याच्या आरोपात अटक केली आहे.
त्यांच्याकडून पोलिसांनी लूटमधील जवळपास १७ लाख रुपयांचे सोने, १ इटली बनावटी ची ९ एम एम पिस्टल आणि १० जीवंत काडतूसे पकडले आहेत.