नवी मुंबई : एमआयडीसीचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी आबासाहेब जर्हाड यांच्या समवेत आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी एमआयडीसी मार्फत १९९५ साली स्थलांतरित केलेल्या कुकशेत गावातील ग्रामस्थांच्या आजही अनेक मागण्या प्रलंबित होत्या. त्या मागण्या संधर्बात तसेच ठाणे तालुक्यातील एमआयडीसी प्रकल्पग्रस्थ शेतकर्यांचे वर्षानुवर्षेपासूनची प्रलंबित प्रश्नावर चर्चा करण्यात आली.
या चर्चेमध्ये एमआयडीसी कडून कुकशेत गाव स्थलांतरित करताना ग्रामस्थांच्या दिलेल्या भूखंडाचा करारनामा आजपर्यंत एमआयडीसीकडून केलेला नव्हता. तो तातडीने करण्याबाबतची मागणी आमदार सौ. मंदा म्हात्रे यांनी केली. त्यावर जर्हाडांनी येत्या काही दिवसांत कुकशेत गावकर्यांच्या भूखंडाचे करारनामे करण्यात येतील असे आश्वासन दिले. त्याचबरोबर कुकशेत गावासाठी नियोजित मंजूर नकाशाप्रमाणे सुवीधांचे भूखंड आजही गावकर्यांना मिळालेले नाहीत. (उदा. स्मशान भूमी, मंदिर इत्यादी) त्याबरोबर तातडीने चोकशी करण्याचे आश्वासन देण्यात आले. त्याच बरोबर एमआयडीसीकडून कुकशेत गावाचे नवी मुंबई महापालिकेला हस्तांतरित केलेल्या भूखंड मंजूर केलेल्या सुवीसुवीधासाठीचे तेथील ग्रामस्थासाठी त्याचा वापर व्हावा महापालिकेने मनमानी स्वरूपामध्ये वापर बदल करू नये त्यावर भूखंड हस्थांतर करताना नवी मुंबई महापालिकेबरोबर झालेल्या करारनाम्याची चोकशी एमआयडीसीमार्फत केली जाईन असेही आश्वासन जर्हाड साहेबांनी दिले.
त्याचबरोबर एमआयडीसी प्रकल्पग्रस्त शेतकर्यांच्या वर्षानुवर्षे जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवलेल्या मागण्या संदर्भात सविस्थर चर्चा करण्यात आली. त्यामध्ये १०० मी. भूखंडासाठी आकारण्यात येत असलेले किंमत, शेतकर्यांना दिले जाणारे भूखंड हे औद्योगीकीकरणासाठी देण्यात यावेत. तरुणांना/महिलाना त्वरित रोजगार उपलब्ध व्हावा, महिला/अपंगांसाठी छोटे छोटे स्टॉल उपलब्ध करून देणे याबाबत तातडीने लक्ष देऊन त्या सोडविण्याच्यादृष्टीने प्रादेशिक अधिकारी यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली.
तसेच औद्योगिक प्रशिक्षण केंद्र (आयटीआय) ची मागणी प्रामुख्याने करण्यात आली. त्याबाबत एमआयडीसीकडून जागा उपलब्ध करून देण्याला तैयार आहात. उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालयाच्या वतीने आपण मंजुरीसाठी प्रयत्न करावा असे सांगण्यात आले. त्याबाबत एमआयडीसी पाठपुरावा करेल परंतु आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी शासनाच्या स्तरावर आम्हाला मदत करावी असे जर्हाडांनी विनंती केली. अशा प्रकारे अनेक विषयावर सविस्तर चर्चा झाली. या संदर्भात लवकरात लवकर झालेल्या चर्चेचा पाठपुरावा करण्या संदर्भात पुढची बैठक लावण्यात येईन असे सांगितले. यावेळी डॉ. राजेश पाटील, श्रीराम घाटे, मेघनाथ पाटील, विजय म्हात्रे, सौ. अलका म्हात्रे, सौ. संगीता म्हात्रे, तसेच कृती समितीचे वसंत म्हात्रे, महादेव मढवी, नारायण पाटील व इतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सौ. पवार प्रादेशीक अधिकारी ठाणे व रायगड व इतर अधिकारी उपस्थित होते.