नवी मुंबई : महानगरपालिकेच्या विशेष सर्वसाधारण सभेत महापौर सुधाकर सोनवणे यांनी नवी मुंबई महानगरपालिका सेवेत असलेले तसेच प्रतिनियुक्तीवरील अधिकारी व कर्मचारी आणि करार पध्दतीवर वेतनश्रेणीमध्ये कार्यरत असलेले अधिकारी व कर्मचारी यांना सन २०१४-०१५ या आर्थिक वर्षाकरीता रू. १५ हजार त्याचप्रमाणे ठोक पगारावरील रोजंदारीवरील (आरोग्य सेवक), मानसेवी अधिकारी/ कर्मचारी यांना मिळणारी एकत्रित रक्कम किमान रू. ८ हजार रक्कम सानुग्रह अनुदान म्हणून देण्याचे जाहीर केले. महापालिका सभागृहाने यास बहुमताने मंजूरी दिली.
कंत्राटी कामगारांच्या वेतनास होणारा विलंब व त्यांना तुटपुंज्या वेतनावर करावे लागत असलेले काम पाहून सिडकोचे माजी संचालक व शिवसेना नगरसेवक नामदेव भगत यांनी कंत्राटी कामगारांना दिवाळी बोनस म्हणून एक महिन्याचे वेतन देण्याची मागणी नुकतीच महापालिका आयुक्तांकडे केली होती.