नवी मुंबई : ऐरोली विधानसभा मतदार संघात सुरु असणारे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक आणि ऐरोलीकरांकरीता निर्माणाधीन असणार्या नाट्यगृहाच्या कामांचा शनिवारी (ता.२१) शनिवारी आ.संदीप नाईक यांनी आढावा घेतला. डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे काम अंतिम टप्प्यात आल्याबाबत समाधान व्यक्त करीत नाट्यगृहाच्या कामाला नियोजित वेळेत पुर्ण करण्याकरीता अधिकार्यांना महत्वाच्या सूचना केल्या. शहरात सुरु असणारी विकास कामे नियोजित वेळेत पुर्ण करण्यासाठी पालिका आयुक्त दिनेश वाघमारे व महापौर सुधाकर सोनावणे यांच्या समवेत लवकरच आढावा बैठक घेणार असल्याचेही स्पष्ट केले.
ऐरोली विधानसभा मतदार संघाचे आ.नाईक यांनी शनिवारी ऐरोली सेक्टर-१५, दिवागाव येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक आणि ऐरोली सेक्टर-९ येथील नाटयगृहाच्या कामाचा महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी, अभियंता यांच्या समवेत पाहणी दौरा केला. या वेळी महापौर सुधाकर सोनावणे उपस्थित होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या कामाचा आढावा घेताना आ.नाईक यांनी कॉन्फरन्स रुम, बहूउदेशीय हॉल, पोडीयम गार्डन, ग्रंथालय, प्रवेशद्वार, कलादान, त्याच बरोबर आमदार निधीतून साकारत असलेले ऍम्पी थीएटर याच्या तांत्रिक बाबी जाणून घेतल्या. स्मारकाच्या शिलेतील आणि सर्वात उंचीचा साकारत असलेला डोमची प्रत्यक्षात जाऊन पाहणी केली. डॉ.आंबेडकर स्मारकाचे काम अंतिम टप्प्यात आल्या असून शहरासाठी प्रेरणादायी वास्तू उपलब्ध होणार असल्याबद्ल समाधान व्यक्त केले. येत्या वर्षभरात याचे काम पुर्ण होऊन नागरिकांना या स्मारकाचा आनंद घेता येईल, असा आशावाद देखील आ.नाईक यांनी व्यक्त केला.
ऐरोली येथील नागरिकांच्या कला, संस्कृतीला एक व्यासपीठ मिळावे या हेतूने साकारत असलेल्या नाट्यगृहाच्या कामाची देखील आ.नाईक यांनी पाहणी केली. सदरच्या कामात असणार्या तांत्रिक अडचणी सोडविण्यासाठी आपण स्वत: आयुक्त, महापौर आणि अधिकारी वर्गासमवेत बैठक घेणार घेणार असल्याचे सांगत सर्वोत्तोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. एखाद्या प्रकल्प साकारत असताना त्याला अधिकाधिक चांगल्या दर्जाचे आणि दीर्घकालीन टिकाऊ राहील अशा तंत्रज्ञानाने बनविणे आवश्यक असल्याचेही स्पष्ट करत नाट्यगृहाच्या कामाला गती देण्याच्या सूचना अधिकार्यांना केल्या.
या प्रसंगी कार्यकारी अभियंता हरिष चीचारीया, कनिष्ठ अभियंता इसामे, अभियंता जयंत कांबळे, मे.ईगल कन्सट्रक्शन कंपनीचे राजकुमार कुशलानी, अभियंता शंकर पवार, उपअभियंता शहाजी पराळकर, संतोष गवळी, महावीर कन्सट्रक्शन कंपनीचे प्रमुख अधिकारी त्याच बरोबर राष्ट्रवादीचे फ-प्रभाग समितीचे माजी सदस्य दीपक पाटील, माजी नगरसेवक संजय पाटील, परिवहनचे माजी सभापती उमाकांत नामवाड, शिक्षण मंडळाचे माजी सदस्य विष्णू धनावडे, जयेश कोंडे, समाजसेवक नरेंद्र कोटकर, समाजसेवक राजू धनावडे, दिनेश पारख, चिंतामण केणी आदी मान्यवर उपस्थित होते.