मुंबई : कोकण रेल्वे मार्गावर दुपदरीकरणाचे काम सुरू असल्याने मध्य रेल्वेकडून कासू ते नागोठाणे स्टेशनदरम्यान आज विशेष ब्लॉक घेण्यात आलाय. दुपारी १२.५० ते संध्याकाळी ६.५० या वेळेत दुपदरीकरणाची कामं करण्यात येणार आहे. परिणामी अप आणि डाऊनवरील काही मेल-एक्स्प्रेस गाड्या या रद्द केल्या जाणार आहेत.
दिवा-रोहा डेमू पॅसेंजर सकाळी ९.१० मिनिटांनी सुटणारी गाडी कासू स्टेशनपर्यंत चालवण्यात येईल. तर रोहा डेमू पॅसेंजर ही गाडी कासू येथून दु ४.१० मिनिटांनी सोडण्यात येईल. डाऊन मार्गावरील लोकमान्य टिळक टर्मिनस ते थिरुवनंतपुरम नेत्रावती एक्स्प्रेस दु. २.२० मिनिटांनी आणि मुंबई-मडगाव कोकणकन्या एक्सप्रेस सीएसटीहून रात्री १२.३० मिनिटांनी चालविण्यात येणार आहे.
एलटीटी-मंगळूर मत्स्यगंधा एक्स्प्रेस आणि दादर-रत्नागिरी पॅसेंजर या गाड्या नियमितपणे चालविण्यात येणार आहेत. अप मार्गावर थिरुवनंतपुरम-मुंबई नेत्राव़ती एक्स्प्रेस नियमित वेळेपेक्षा ५ तास उशिरानं तर मडगाव-सीएसटी मांडवी एक्स्प्रेस रात्री १०.४५ वाजता सीएसटीला पोहोचेल.